मुंबई, दि. 1 : विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी देशातील परीक्षा व्यवस्था अधिक पारदर्शक आणि सक्षम करण्याच्या अनुषंगाने आपलं मोदी सरकार सातत्याने कार्यरत आहे.
याचाच एक भाग म्हणून परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी मोदी सरकारकडून विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच प्रत्येक नागरिकाकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. संबंधित सुचना किंवा कल्पना इंग्रजी, हिंदी किंवा कोणत्याही प्रादेशिक भाषेत पाठवता येतील.
परीक्षा प्रक्रियेशी संबंधित तुमच्या कल्पना किंवा सुधारणा सुचविणारे विचार सरकारपर्यंत थेट पोहोचवण्याची ही एक महत्त्वाची संधी आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून नव्या भारताच्या अधिक सक्षम आणि विश्वासार्ह परीक्षा व्यवस्थेसाठी आपला सहभाग नोंदवा.
तुमच्याकडे काही कल्पना किंवा सूचना असतील, तर खाली दिलेल्या माहितीच्या आधारे सरकारपर्यंत नक्की पोहोचवा. तुमची एक सूचना, परीक्षा व्यवस्थेतील एका मोठ्या सुधारणेची सुरुवात ठरू शकते.
व्हॉट्सअॅप 7827042830
वेबसाइट: http://examreforms-taskforce.dopt.gov.in
हेल्पलाइन: 1800-180-4747
ई-मेल: http://examreforms-taskforce.dopt.gov.in
सूचना पाठवण्याची अंतिम तारीख: 13 सप्टेंबर 2026




