• September 12, 2026
  • टीम मनोगत भाजपा
  • 0

मुंबई, दि. 12 : गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुकर व आनंदी व्हावा, यासाठी मुंबई अध्यक्ष अमित साटम आणि कॅबिनेट मंत्री तसेच मुंबई उपनगराचे सहपालकमंत्री मंगल प्रभात लोढा जी यांच्या विशेष पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या ‘नमो एक्सप्रेस’ (मुंबई ते सावंतवाडी) या विशेष रेल्वेला आज शनिवार दि. 12 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस प्लॅटफॉर्म क्र. १८ वरून हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले.

या प्रसंगी नगरसेवक श्री. रोहिदास लोखंडे जी, नगरसेवक सनी सानप, शरद चिंतणकर आणि पक्षाचे इतर सर्व मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

बाप्पाच्या आगमनासाठी कोकणात जाणाऱ्या सर्व गणेशभक्तांना व चाकरमान्यांना सुखकर, सुरक्षित प्रवासाच्या आणि आगामी गणेशोत्सवाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा