ज्येष्ठ काँग्रेस नेते पी.चिदंबरम यांनी आपण नक्षली आहोत, याचा मला अभिमान आहे, असे वक्तव्य नुकतेच केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात ‘दिमागी नक्षल’ हा शब्द प्रयोग वापरल्यानंतर चिदंबरम यांनी हे वक्तव्य केले. केवळ पंतप्रधानांना विरोध करण्यासाठी चिदंबरम यांनी हे वक्तव्य केले. मात्र हेच चिदंबरम केंद्रीय गृहमंत्री असताना शहरी नक्षलवाद हे देशापुढील सर्वात मोठे संकट असल्याचे म्हणत होते. चिदंबरम यांच्यानंतर केंद्रीय गृहमंत्री झालेले सुशिलकुमार शिंदे यांनीही शहरी नक्षलवादाचा धोका मोठा असल्याचे सांगितले होते. नोव्हेंबर 2013 मध्ये डॉ.मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र दाखल करून शहरी नक्षलवादी देशापुढचे संकट असल्याचे नमूद केले होते. शहरी नक्षलवादी हे वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून काम करीत असून त्यांचा संबंध भारतीय कम्युनिस्ट पक्षाशी (माओवादी) असल्याचे मनमोहन सिंग सरकारने शपथपत्रात म्हटले होते. मानवी हक्काच्या नावाखाली काम करणार्या संघटना या प्रत्यक्षात शहरी नक्षलवाद्यांशी संबंधित असल्याचे त्या शपथपत्रात निदर्शनास आणले गेले होते. याबाबत पी. चिदंबरम यांनी केलेली वक्तव्ये आजही यूट्यूबवर उपलब्ध आहेत.
केंद्रातील सत्तेत असताना ज्या नक्षलींना चिदंबरम हे देशापुढील संकट म्हणत होते ते चिदंबरम आज नक्षली असल्याचा मला अभिमान आहे, असे म्हणू लागले आहेत. यातून काँग्रेसचे संधीसाधू राजकारण उघडे पडले आहे. काँग्रेसच्या काळात नक्षलवाद्यांची दहशत प्रचंड वाढली होती. काँग्रेसच्या दुबळ्या धोरणांमुळेच देशात नक्षलवाद फोफावला, अशी टीका करणारा लेख ज्येष्ठ पत्रकार आणि इंडियन एक्स्प्रेसचे माजी संपादक शेखर गुप्ता यांनी 3 सप्टेंबर 2018 रोजी ‘द प्रिंट’ या वृत्तपत्रात लिहला होता. हा लेखही इंटरनेटवर उपलब्ध आहे. नक्षलवाद्यांनी केंद्रीय हजारो सुरक्षा दल जवानांच्या आणि हजारो पोलिसांच्या हत्या केल्या. हजारो युवकांची दिशाभूल करून त्यांना हिंसक नक्षलवादी बनवले. मोदी सरकारने गेल्या 12 वर्षात कठोर उपाययोजना करून नक्षलवाद्यांचा बिमोड केला आहे. जंगलात लपून बसलेले नक्षलवादी एकतर ठार झाले आहेत किंवा सरकारला शरण आले आहेत. मात्र अनेक बुद्धिवंत, विचारवंत म्हणवणारी मंडळी मोठ्या शहरांमध्ये विविध मार्गांनी नक्षलवादी तयार करत आहेत. त्यासाठी विविध जाती गटांची दिशाभूल केली जात आहे. वेगवेगळ्या समाजांमध्ये वैमनस्य निर्माण केले जात आहे.
गृहमंत्री असताना आर आर आबा नक्षलवाद्यांबद्दल काय म्हणाले होते हे पहा
महाराष्ट्रात कबीर कला मंच नावाची संघटना अनेक दिवस काम करत आहे. 2013 मध्ये कबीर कला मंचाच्या काही कार्यकर्त्यांनी त्यावेळचे राज्याचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या समोर आत्मसमर्पण केले होते. त्यावेळी आर.आर.पाटलांनी नक्षली संघटना विरोधात कठोर भूमिका घेतली होती. याच कबीर कला मंचाच्या कार्यकर्त्यांना 2018 झालेल्या भीमा-कोरेगाव येथील दंगलप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्यावेळी आर.आर.पाटील म्हणाले होते की जंगलात दडून बसलेल्या नक्षलवाद्यांचे खरे सूत्रधार शहरातच आहेत. नक्षलवाद्यांना लागणारी सर्व रसद, पैसा आणि शस्त्रे शहरांमधूनच पुरवली जातात. पुण्यासारख्या शहरात नक्षलवाद्यांचा टे्रनिंग कँप झाल्याचे आर.आर. पाटील यांनी विधानसभेत सांगितले होते. त्याबाबतचे पुरावे आर. आर. आबांनी विधानसभेत सादर केले होते. नक्षलवाद्यांच्या सूत्रधारांना पडकण्यासाठी कायदे कमी पडतात, अशी खंतही आर. आर आबांनी विधानसभेत बोलताना व्यक्त केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘दिमागी नक्षली’ या शब्द प्रयोगाला आक्षेप घेणार्या काँग्रेसच्या नेत्यांनी आपण सत्तेत असतानाच्या काळात चिदंबरम, सुशिलकुमार शिंदे यांच्यासारखे नेते नक्षलवाद्यांबाबत काय म्हणाले होते हे आठवून पहावे.
चिदंबरम यांच्या वक्तव्याच्या लिंक –













