JSW ग्रुपची जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया जवळपास पूर्णत्वाला आली आहे. चामोर्शी येथे MIDC सुमारे 3000+ हेक्टर जमीन विकसित करण्याच्या प्रक्रियेत आहे. लोहखनिज ब्लॉकमध्ये शोधकार्य सुरू झाले आहे. खाण आणि कच्च्या मालाची उपलब्धता निश्चित केली जात आहे. पहिल्या टप्प्याचे लक्ष्य साधारण 2029 आहे. गुंतवणूक : ₹1 लाख कोटी.

1. लॉइड्स मेंटल्स च्या प्रकल्पाची लक्षणीय प्रगती झाली आहे. कोंसरी येथे स्लरी पाइपलाइन आणि प्रत्येकी 4 MTPA क्षमतेचे दोन पेलेट प्लांट कार्यरत आहेत! एकूण क्षमता 8 MTPA असून येथून निर्यातही केली जात आहे!! खाणकामाला वेग आला आहे. स्टील कॉम्प्लेक्सचे बांधकाम वेगाने सुरू असून वायर रॉड/TMT उत्पादन लवकरच अपेक्षित आहे. मुख्य स्टील प्रकल्पांसोबत इतर स्टील सुविधा विकसित करणे व विस्तार करण्याचे काम पुढे सुरू आहे. गुंतवणूक : ₹45000 कोटी + ₹15000 कोटी विस्तार.

2. सूरजगढ इस्पातच्या प्रकल्पाची 2024 मध्ये पायाभरणी झाली. पहिल्या टप्प्यासाठी पर्यावरणीय मंजुरी आणि सार्वजनिक सुनावणी पूर्ण झाली आहे. विस्तारासाठी सामंजस्य करार (MoU) करण्यात आला आहे. पहिला टप्पा 2026 मध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. गुंतवणूक : ₹20000 कोटी

3. सुपर स्मेलटर्स बरोबर 2026 च्या सुरुवातीला 2 MTPA क्षमतेच्या प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आला. हा प्रकल्प अद्याप नियोजनाच्या टप्प्यात आहे. लोहखनिजाच्या उपलब्धतेची हमी मिळवण्याची प्रक्रिया येत्या काही आठवड्यात पूर्ण होईल. गुंतवणूक : ₹10000 कोटी.

(MTPA म्हणजे Million Tonnes Per Annum – अर्थात, वार्षिक दशलक्ष टन उत्पादन क्षमता.)
मी कालच सांगितलं. संजय गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी मिळून 9 वेळा अमेठीचे प्रतिनिधित्व करूनही एकही प्रकल्प अमेठीत आणला नाही. इकडे देवाभाऊंनी फक्त दीड वर्षात (पालकमंत्री असताना) एवढे प्रकल्प आणून ते मार्गी पण लावलेत. शाळा सुरू केल्या, एसटी सेवा सुरू केली, मोबाईल टॉवर्स उभे करून कार्यान्वित केले, 15 ऑगस्टला अनेक ठिकाणी तिरंगा डौलाने फडकत होता अश्या अनेक सकारात्मक गोष्टींची जंत्रीच आहे. पण त्याच बरोबर देवेंद्रजी यांनी मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती करणाऱ्या या मेगा-प्रकल्पांवर पण अथकपणे काम केले.

पशुपती ते तिरुपती पर्यंत पसरलेल्या रेड कॉरिडॉरमधून नक्षलवाद संपवण्यात आला असला, तरी या भागाला माओवाद्यांनी एवढी दशके देशाच्या मुख्य प्रवाहात येऊ दिले नव्हते. त्या भागांचा आता विकास करणे गरजेचे आहे, जेणेकरून मुख्यधारेपासून दूर ठेवण्यात आलेल्या या भागातील लोकांना खऱ्या अर्थाने आपलंसं करता येईल. गडचिरोलीत नक्षलवादाने पुन्हा कधीच डोके वर काढू नये म्हणून नक्षल-मुक्त गडचिरोलीत विकासाची गंगा नेऊन तिथे लवकरात लवकर आर्थिक सुबत्ता येणेही महत्वाचे होते. गडचिरोलीचा ‘विकास’ हा तिकडच्या माओवादाच्या ताबूतातील शेवटचा खिळा ठरणार, हा माझा विश्वास आहे! शाब्बास देवेंद्रजी.

– वेद कुमार

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा