नवी दिल्ली, दि. 17 : पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिवसानिमित्त आज सेवा संकल्प अभियाना अंतर्गत भाजपा मुख्यालयात आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री. नितीन नबीन जी यांनी स्वतः रक्तदान करून केले.

‘आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या २५ वर्षांच्या सार्वजनिक जीवनाची प्रेरणा राष्ट्रसेवा आणि जनकल्याणाच्या संकल्पाशी जोडलेली आहे. याच भावनेला जनसहभागाच्या माध्यमातून पुढे नेत रक्तदान करणे म्हणजे गरजू व्यक्तीचे प्राण वाचविण्याच्या दिशेने उचललेले एक सहज आणि अर्थपूर्ण पाऊल आहे; असे नितीन नबीन म्हणाले.

रक्तदान करणाऱ्या कार्यकर्ते आणि नागरिकांची त्यांनी भेट घेतली. तसेच या उपक्रमात योगदान दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले.

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा