कर्जत, (अहिल्यानगर) दि. 19 : देशाचे लोकप्रिय पंतप्रधान श्री.नरेंद्र यांच्या ७६ व्या वाढदिवसानिमित्त प्रबोधनकार क्रीडा व सांस्कृतिक ग्रामीण सेवाभावी प्रतिष्ठान कर्जत व भाजपा कर्जत मंडल च्या वतीने येथील सर्व पत्रकारांचा केंद्र सरकारच्या पोस्ट विभागाच्या माध्यमातून दहा लाख रुपयाचा अपघाती विमा उतरवण्याचा अनोखा उपक्रम पत्रकार कट्टा येथे आयोजित करण्यात आला.

आपल्याला सातत्याने वर्तमानपत्रात व मोबाईलवर चालू घडामोडी ज्या पत्रकारांमुळे पाहायला वाचायला मिळतात जो पत्रकार सातत्याने आपल्याला समाजातील चांगल्या वाईट बातम्यांच्या घडामोडी देत असताना अनेक संकटांना तो तोंड देत असतो तर अनेक वेळा अनेकांच्या रोशालाही त्याला सामोरे जावे लागते या सर्व पत्रकारांना व त्याच्या कुटुंबाला एक विमा संरक्षण असावे म्हणून गेली तीन वर्षापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आता पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रबोधनकार प्रतिष्ठानच्या वतीने हे विमा कवच देण्यात येत आहे.

यावेळी कर्जत नगरपंचायत च्या नगराध्यक्ष सौ छायाताई शेलार, भाजपा कर्जत मंडल चे अध्यक्ष श्री अनिल गदादे उपाध्यक्ष मा.श्री.पप्पूशेठ धोदाड श्री.सुनील शेलार, पोस्ट मास्तर श्री. कैलास भुजबळ पत्रकार श्री गणेश जेवरे, श्री सुभाष माळवे श्री मच्छिंद्र अनारसे, श्री मोतीराम शिंदे, अफरोज पठाण भाऊसाहेब तोरडमल, ऋषिकेश पवार, पवन माने, दीपक शिरसाठ, अशोक मोकाशे, नागराज चखाले आदि मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित होते.

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा