रत्नागिरी, दि. १० : भाजपा रत्नागिरी उत्तर जिल्हा कार्यकारिणी बैठकीदरम्यान प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रमुख पदाधिकाऱ्यांनी भाजपा परिवारात प्रवेश केला. मंडणगड नगरपंचायतीमधील पाणीपुरवठा समितीचे सभापती सुभाष सापटे, नगरसेवक शैलेश शिवगण, नगरसेविका समृद्धीताई शिगवण, नगरसेवक दिनेश सापटे, नगरसेविका राजश्रीताई सापटे, खेड पंचायत समितीचे माजी सभापती विजयराव कदम, खेडचे शिवसेना संपर्कप्रमुख राजेंद्र निकम, खेड तालुका शिवसेना उपसंघटक युवराज गुजर, ऐनवरे खेडचे उपसरपंच तानाजी पोफळकर, माणीचे सरपंच राकेश शिंदे, उबाठा भरणे विभागप्रमुख अविनाश वाडेकर, रेहेळे भागडी गावातील माजी सरपंच तुकाराम बामणे, शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख प्रकाश बामणे यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
यावेळी प्रदेश सरचिटणीस आ. योगेश सागर, प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, आ. प्रमोद जठार, भाजपाचे रत्नागिरी उत्तर जिल्हाध्यक्ष सतीशराव मोरे, माजी आमदार विनय नातू, खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



































