मुंबई, दि. 18 : पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री. नितीन नवीनजी यांनी ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत आरोग्यसेवेचे उपक्रम राबविण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रथमोपचार पेटी (FIRST AID BOX) भेट देण्याचा संकल्प माजी आमदार,व प्रवक्ता भाजपा महाराष्ट्र श्री. अतुल शाह यांनी केला आहे.

या उपक्रमाचा शुभारंभ मा. श्री. नितीन नवीनजी यांच्या हस्ते, मा.श्री. आशिष शेलार यांच्या वांद्रे येथील गणेशोत्सव मंडळात करण्यात आला. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री *मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, भाजप महाराष्ट्र अध्यक्ष मा. श्री. रविंद्रजी चव्हाण, मा. श्री. आशिष शेलार आणि *श्री.शिवप्रकाशजी यांची प्रमुख उपस्थिती होती.

गणेशोत्सवाच्या काळात कार्यकर्ते, सेवेकरी व गणेशभक्तांना आकस्मिक प्रसंगी तातडीने प्राथमिक उपचार मिळावेत, या उद्देशाने हा सेवाभावी उपक्रम राबविण्यात येत आहे.

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा