मुंबई, दि. 7 : ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महा अभियान २०२६’ अंतर्गत सोलापूर, कोल्हापूर, सांगली आणि इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रातील भाजपा नगरसेवकांची प्रशिक्षण शिबिर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे संपन्न झाली.
भाजपा महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण उपस्थित होते. सुशासन, प्रभावी लोकप्रतिनिधित्व, संघटनात्मक कार्यपद्धती, विकासाभिमुख दृष्टिकोन आणि चारही महानगरपालिका क्षेत्रातील संघटनात्मक वाटचालीबाबत उपस्थितांशी संवाद साधला.
याप्रसंगी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्यासह चारही महानगरपालिका क्षेत्रातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.




































