मुंबई, दि. 18 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात सुरू केलेल्या ‘एक झाड आईच्या नावाने’ या पर्यावरणपूरक अभियानाला अहिल्यानगरच्या कर्जत शहरात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन पोटरे यांनी एक वेगळा आणि भावूक स्पर्श दिला आहे. पोटरे यांनी कर्जत शहरात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आईच्या नावाने ७० विविध झाडांची लागवड केली असून, केवळ झाडे लावून न थांबता गेल्या वर्षभरापासून त्यांचे संगोपनही केले आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्यासोबतच येत्या काळात प्रवाशांना सावली मिळावी आणि शहराचे सौंदर्य युद्धावे, या दुहेरी उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला आहे. शहराच्या मुख्य रस्त्याच्या दुतर्फा पिंपळ, करंजी, चिंच आणि वड यांसारख्या दीघांयुषी व सावली देणाऱ्या देशी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. अनेकदा वृक्षारोपण केल्यानंतर झाडांकडे दुर्लक्ष होते. मात्र, पोटरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी गेल्या वर्षभरापासून या सर्व ७० झाडांना नियमित पाणी देणे, खते घालणे आणि त्यांच्या संरक्षणाची योग्य ती खबरदारी घेतली आहे. त्यामुळे आज ही झाडे उत्तम प्रकारे जगली असून ती वाढू लागली आहेत.

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा