प्रवाशांना विविध विषयांवरील पुस्तके व ग्रंथ उपलब्ध

वेंगुर्ला, (सिंधुदुर्ग) दि. 12 : भारताचे लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ला एसटी आगारात प्रवाशांसाठी मोफत वाचनालयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. या उपक्रमांतर्गत भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरद चव्हाण यांच्या वतीने प्रवाशांना विविध विषयांचे मार्गदर्शन करणारी तसेच सामान्य ज्ञान, शिक्षण, सामाजिक विषय आणि इतर महत्त्वपूर्ण बाबींची माहिती देणारी पुस्तके व ग्रंथ आगाराला भेट देण्यात आले.

एसटी प्रवासादरम्यान प्रवाशांना मिळणाऱ्या प्रतीक्षेच्या वेळेचा विधायक उपयोग व्हावा, वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि विविध विषयांची माहिती सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. आगारात उपलब्ध करून देण्यात आलेल्या पुस्तकांचा प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.

या उपक्रमाबद्दल एसटी कर्मचाऱ्यांच्या वतीने आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे यांनी शरदजी चव्हाण यांचे आभार मानले. उपलब्ध पुस्तकांमधून प्रवाशांना विविध विषयांची माहिती मिळून त्याचा दैनंदिन जीवनात उपयोग होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

या प्रसंगी भाजपा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, वेंगुर्ला उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, आगार व्यवस्थापक नवज्योत गावडे, स्थानक प्रमुख तेजस तारी, सहाय्यक वाहतूक निरीक्षक अजित कदम, सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघाचे राज्य कार्यकारिणी उपाध्यक्ष भरत चव्हाण, आगार सचिव दाजी तळवणेकर यांच्यासह स्वप्नील रजपूत, नगरसेवक सचिन शेट्ये , अनंत पालकर, मनोज दाभोलकर, विनायक दाभोलकर, सुनिल सावंत तसेच अन्य कर्मचारी उपस्थित होते.

प्रवाशांच्या प्रतीक्षेच्या वेळेचा सदुपयोग करून ज्ञानवृद्धीला चालना देणारा हा उपक्रम सुरू झाल्याने प्रवाशांकडून त्याचे स्वागत होत आहे.

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा