मुंबई, दि. 14 : ‘हर घर तिरंगा अभियान २०२६’ अंतर्गत जिल्हा सातारा येथील कराड दक्षिणमध्ये गुरुवार, दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. लाहोटी कन्याशाळा, कराड येथून सकाळी ९ वाजता या रॅलीला उत्साहात सुरुवात झाली.
लाहोटी कन्याशाळा, चावडी चौक, आझाद चौक, शिवतीर्थ दत्त चौक असा रॅलीचा मार्ग होता. हातात तिरंगा घेऊन नागरिक, भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच राष्ट्रभक्त विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले. ‘भारत माता की जय’ अशा देशभक्तीपर घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.तिरंगा रॅलीच्या माध्यमातून नागरिकांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्राभिमान तसेच राष्ट्रध्वज तिरंग्याप्रती असलेला सन्मान अधिक दृढ करण्याचा संदेश देण्यात आला. रॅलीच्या संपूर्ण मार्गावर कराडकर नागरिकांनी पुष्पवृष्टी करून सहभागींचे उत्स्फूर्त स्वागत केले. त्यामुळे संपूर्ण परिसरात उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले.
हर घर तिरंगा’ अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रध्वजाचा सन्मान, देशभक्तीची भावना आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश जनमानसात पोहोचविण्याचे कार्य या भव्य रॅलीच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष आ. मा. श्री. डॉ. अतुलजी भोसले, कराड उत्तरचे आ. मा. श्री. मनोजदादा घोरपडे, माजी आ. मा. श्री. आनंदराव पाटील, भाजपा पश्चिम महाराष्ट्र संयोजक मा. श्री. विक्रमजी पावसकर यांच्यासह विविध मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि राष्ट्रभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



































