नाशिक, दि. 27 : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, नाशिक महानगरच्या वतीने आयोजित करण्यात आलेली संघटनात्मक बैठक संभाजीनगर येथील विजयलक्ष्मी लॉन्स येथे उत्साहपूर्ण व सकारात्मक वातावरणात संपन्न झाली. भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आ. चित्राताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत महिला मोर्चाच्या संघटनात्मक बांधणीसह आगामी काळातील विविध उपक्रम व पक्षविस्ताराबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यावेळी प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांनी महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगितले. केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी महिला कार्यकर्त्यांनी सक्रियपणे काम करावे, तसेच संघटनेच्या माध्यमातून अधिकाधिक महिलांना पक्षाशी जोडण्याचे आवाहन त्यांनी केले.

नाशिक शहर व नाशिक ग्रामीणमधील महिला मोर्चाच्या प्रदेश पदाधिकारी तसेच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केलेल्या संघटनात्मक कार्याचे चित्राताई वाघ यांनी कौतुक केले. त्यांच्या या कौतुकामुळे महिला कार्यकर्त्यांना आगामी काळात अधिक जोमाने काम करण्यासाठी निश्चितच प्रेरणा व बळ मिळाले. यावेळी आ. देवयानी फरांदे व आ. सीमा हिरे यांनीही उपस्थित महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. महिलांनी संघटनात्मक कार्यासोबतच सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेऊन समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचावे, असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीदरम्यान महिला मोर्चाची आगामी कार्यपद्धती, संघटनात्मक विस्तार, बूथस्तरावरील कामकाज, महिला कार्यकर्त्यांचा सहभाग वाढविणे तसेच पक्षाची विचारधारा व शासनाच्या विविध योजनांचा प्रभावीपणे प्रचार-प्रसार करण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. महिला शक्तीच्या माध्यमातून पक्षसंघटना अधिक सक्षम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

बैठकीस प्रदेश पदाधिकारी सुजाता करजगीकर, भारती बागुल, जयश्री अहिरराव, महिला मोर्चा प्रभारी रेश्मा निवळे, महिला मोर्चा अध्यक्ष स्वाती भामरे, नाशिक महानगर सरचिटणीस रश्मी हिरे, ललिता बिरारी, सोनाली कुलकर्णी, पुष्पा पाटील, छाया देवांग, शिल्पा पारनेरकर, माधुरी पालवे तसेच महिला मोर्चाच्या मंडल अध्यक्ष संगीता जाधव, वर्षा सरदार, छाया परेवाल, निशा क्षीरसागर, शर्वरी कुलकर्णी, धनश्री गिरासे, ऋतुजा नारद, गीता सामसूका, अर्चना थोरात, नलिनी दराडे यांच्यासह महिला मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

महिला शक्तीच्या संघटनात्मक सहभागातून भारतीय जनता पार्टीची संघटना अधिक व्यापक आणि बळकट करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. त्यामुळे आगामी काळात नाशिक शहरासह ग्रामीण भागात महिला मोर्चाच्या माध्यमातून विविध संघटनात्मक व सामाजिक उपक्रमांना अधिक गती मिळणार असल्याचे चित्र बैठकीतून स्पष्ट झाले.

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा