नाशिक, दि. 27 :  भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुल्तानी यांनी अल्पसंख्याक मोर्चाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर केली असून, यामध्ये नाशिकचे शेख नियाज अ वाहीद (नामा हाजी)यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी तसेच अल्पसंख्याक समाजातील नागरिकांना भाजपच्या विचारधारेसोबत जोडण्यासाठी शेख नियाज अ वाहीद (नामा हाजी )यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे नाशिक जिल्ह्यातील भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या कार्याला अधिक बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, प्रदेश नेतृत्व तसेच अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुल्तानी यांच्या मार्गदर्शनाखाली शेख नियाज अ वाहीद (नामा हाजी )पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी प्रभावीपणे काम करतील, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

या नियुक्तीबद्दल नाशिक शहर व जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध स्तरांतून शेख नियाज अ वाहीद (नामा हाजी) यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या पुढील संघटनात्मक वाटचालीसाठी सर्वांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा