‘सेवा मेरा योगदाना’तून डायबेटिस फ्री मुंबईकडे वाटचाल

मुंबई, दि. 22 : आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात ‘सेवा संकल्प अभियान’ आयोजित करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत ‘सेवा मेरा योगदान’ मोहिमेच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी, मुंबईतर्फे आज संपूर्ण मुंबईत ‘डायबिटीज फ्री मुंबई’ अभियान राबवले जात आहे.

या मोहिमेअंतर्गत मुंबईतील प्रत्येक वॉर्डात विनामूल्य रँडम ब्लड शुगर व ब्लड प्रेशर (BP) तपासणी शिबिरांचे आयोजन केले आहे.

आपल्या जवळच्या केंद्राला भेट देऊन स्वतःची व कुटुंबाची मोफत आरोग्य तपासणी करून घ्यावी आणि ‘डायबिटीज मुक्त मुंबई’ घडवण्यात आपले योगदान द्यावे; असे आवाहन भाजपा मुंबई अध्यक्ष आ. अमित साटम जी यांनी केले. यावेळी कॅबिनेट मंत्री अॅड. आशिष शेलार जी यांनी उपस्थिती लावून तपासणी शिबिराचा आढावा घेतला.

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा