मुंबई, दि. 21 : पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिनानिमित्त ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ अभियानांतर्गत २७, २८ आणि २९ सप्टेंबर २०२६ दरम्यान विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या नागरिकांना ओळखपत्रे, विविध शासकीय प्रमाणपत्रे आणि कल्याणकारी योजनांचा लाभ सुलभतेने मिळावा, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या मार्गदर्शनात ‘भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान’ राबविण्यात येणार आहे.
या विशेष अभियानांतर्गत भटके-विमुक्त बांधवांना आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, नॉन-क्रीमीलेयर प्रमाणपत्र, रहिवास व अधिवास प्रमाणपत्र यांसह विविध शासकीय प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच, विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांचे अधिकारी शिबिरांमध्ये उपस्थित राहतील.
भटके-विमुक्त बांधवांनी या विशेष अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा!

































































































