भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा घणाघात

मुंबई, दि. 3 : जनाब संजय राऊत हे उबाठा गट आणि मनसेच्या उद्याच्या मोर्चाच्या मार्गात बदल झाल्याचे सांगताहेत. पण केवळ त्यांच्या मोर्चाच्या मार्गातच नव्हे तर वैचारिक मार्गातही बदल झालाय. हिंदुत्ववादी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार सोडून ते मुघलांच्या, औरंगजेबाच्या विचारांच्या मार्गावर निघाले आहेत. वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडून सोनिया गांधींच्या मार्गावर निघाले आहेत. म्हणूनच महाराष्ट्रातल्या जनतेने तुमचे विचार आणि तुमचा मार्गही नाकारल्याने तुम्हाला मोर्चा काढण्याचा अजिबात अधिकार नाही, असे भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन ठणकावून सांगितले. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

संजय राऊतांना फक्त काँग्रेसचा पाठिंबा नको. त्यांना बांगलादेशी आणि रोहिंग्यांचा पाठिंबा हवा आहे. मुस्लिम लीगच्या जीवावर यांची पार्टी आता मुस्लिमांची तारणहार बनली आहे. मुस्लिम लीगचा पाठिंबाही उद्याच्या उबाठा आणि मनसेच्या मोर्चाला आहे. कदाचित एमआयएमचाही पाठिंबा असेल. इतकेच नव्हे तर पाकिस्तानातील एखाद्या पक्षाचा पाठिंबाही घ्यायला संजय राऊत मागेपुढे पाहणार नाहीत, असे श्री. बन यांनी सुनावले.

श्री. बन पुढे म्हणाले, देशाचे वातावरण निश्चितपणे बदलले आहे आणि ते नरेंद्र मोदीजी, अमितभाई शाह आणि देवाभाऊंच्या बाजूने आहे. वातावरणातला बदल हा संजय राऊतांच्या लक्षात यायला हवा. महाराष्ट्राचे वातावरण बदलले म्हणूनच महापालिकेला तुम्हाला भोपळाही फोडता आला नाही. 25 वर्षे मुंबई महापालिकेतील तुमची सत्ता घालवून जनतेने भाजपा महायुतीला निवडून दिले. ‘हवा तेज है, टोपी संभालो’, अशी तुमची स्थिती आहे. येत्या काळात तुमची टोपी जमिनीवर पडेल आणि तुम्हाला नाक घासून पुन्हा एकदा वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांकडे आणि हिंदुत्ववादाकडेच यावे लागेल.

भाजपात आणि देशातही अजिबात भूकंप होणार नाही, असे सांगून श्री. बन म्हणाले उबाठा गटात मात्र जानेवारी – फेब्रुवारीपर्यंत नक्कीच मोठा भूकंप होईल आणि या भूकंपाचा केंद्रबिंदू मातोश्री असेल. मातोश्रीमधून उद्धव ठाकरे आता महाराष्ट्रात राहणार का लंडनमध्ये जाणार, याचा निर्णय कदाचित तेव्हा होणार असेल. आदित्य ठाकरे मुंबईमध्ये राहणार का लंडनमध्ये जाणार, याचाही निर्णय होणार असेल. कारण मातोश्रीला मुंबईमधून हद्दपार करत लंडनला नेऊन बसवायची सुपारीच संजय राऊत यांनी घेतली आहे.

बेकायदेशीरपणे आंदोलन केल्याप्रकरणी अभिजीत जितके यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अभिजीत दीपके यांनी कशा पद्धतीने शांतता क्षेत्रात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला हे आपण पाहिले. सध्या सीजेपीमध्ये दोन गट पडले आहेत. एक अभिजीत दीपकेचा गट आणि दुसरा अभिजीत दीपकेच्या विरोधातला गट आहे. काल दादरमध्ये सीजेपीच्या या दोन गटांमध्ये आंदोलनाचे पैसे मिळाले नाहीत म्हणून तुंबळ हाणामारी झाली. यांची अवस्था यापुढे अशीच होणार असल्याचे श्री. बन म्हणाले.

 

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा