मुंबई, दि. 7 : महाराष्ट्राच्या शहरी भागातील आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि सुसूत्र करण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. ग्रामीण आरोग्यव्यवस्थेच्या धर्तीवर आता राज्यातील शहरी भागासाठी स्वतंत्र ‘शहरी आरोग्य आयुक्तालय’ स्थापन करण्यात आले आहे.

हे महाराष्ट्रातील पहिले स्वतंत्र शहरी आरोग्य आयुक्तालय असून, त्याचे मुख्यालय मुंबईत असणार आहे. मुंबईसह ठाणे, कोल्हापूर, नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, लातूर, अकोला आणि नागपूर येथे एकूण ८ प्रादेशिक कार्यालये असणार आहेत. या नव्या प्रशासकीय व्यवस्थेमार्फत महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती आणि कटक मंडळांमधील आरोग्य उपक्रम अधिक प्रभावीपणे राबवता येणार आहेत.

यामुळे शहरी भागातील आरोग्ययंत्रणा अधिक सक्षम होऊन वैद्यकीय उपचार आणि आरोग्य सुविधांची उपलब्धता वाढेल. नागरिकांना अधिक सुलभ, गुणवत्तापूर्ण आणि प्रभावी आरोग्यसेवा मिळावी, यासाठी आपले भाजपा-महायुती सरकार सदैव कटिबद्ध आहे.

 

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा