मुंबई, दि. 20 : कोरोना काळात आपल्या कुटुंबियांना गमावणाऱ्या जवळपास 300 मुला मुलींना देवाभाऊंनी दत्तक घेतले! त्यांचे संगोपन, शिक्षण आणि इतर जबाबदाऱ्या घेतल्या! आज त्यातल्याच एका मुलीचा विवाह देवाभाऊंनी वडील या नात्याने पार पाडला.

एक संकल्प आम्ही केला होता. विशेषतः अनेक परिवारांमध्ये कर्ता पुरुष गेल्यामुळे त्यांच्या पत्नींचं आणि मुलांचं भविष्य अंधारात होतं. त्यावेळी आमचे संदीपजी जोशी हे सिद्धिविनायक फाउंडेशनच्या वतीने पुढे आले आणि त्यांनी घोषणा केली की, अशा परिवारांचे पालकत्व आम्ही स्वीकारू. जवळपास 293 परिवार हे रजिस्टर झाले. मीदेखील तेव्हा त्यांना सांगितलं की, यापैकी 100 परिवारांचं पालकत्व मीदेखील स्वीकारेन, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे केले.

संदीप जोशी यांनी कोरोनापासून आजपर्यंत त्या परिवारांचं शिक्षण असेल, त्यांच्या इतर सगळ्या गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टींकडे त्यांनी लक्ष दिलं. आणि आज त्यापैकी एका एकल मातेचा विवाह या ठिकाणी झालेला आहे. ही जी आमची मुलगी आहे, तिचा विवाह आज शिवम यांच्यासोबत झालेला आहे. पुढच्या काळामध्ये जवळपास या सगळ्या परिवारांमध्ये मिळून 300 मुली आहेत. त्या सगळ्यांचा विवाह होईपर्यंत ही सगळी जबाबदारी संदीपजींच्या नेतृत्वात आम्ही स्वीकारलेली आहे. आज या विवाहाचा अतिशय समाधान आहे, कारण अतिशय कमी वयामध्ये अशा प्रकारच्या घटनेला प्रीतीला सामोरं जावं लागलं आणि आज एक स्थैर्य त्यांच्या जीवनात येतंय, ही आनंदाची गोष्ट आहे. हे कार्य करताना खरोखर अतिशय समाधान मला वाटतं. आणि याकरता संदीप जोशीजी यांचं विशेष आणि मनापासून अभिनंदन करतो.

महाराष्ट्र सरकारने अनाथ मुलांकरता एक टक्का आरक्षण दिलं आहे आणि आता मोठ्या प्रमाणात त्यातून नियुक्त्या होत आहेत. आणि ही पण समाधानाची बाब आहे की, अतिशय गरीब, अनाथ आणि अनेक वेळा तर अनाथ आश्रमातच ज्यांना राहावं लागतं, नातेवाईकदेखील कोणी काळजी घ्यायला नाही, अशीही मुलं आणि मुली ज्यावेळी मेहनत करून परीक्षा देऊन या आरक्षणामुळे त्यांना संधी मिळते आणि सरकारी नोकरीमध्ये ते जातात, ते बघितल्यानंतर खरोखर मनाला समाधान होतं. मध्यंतरी अशा काही आमच्या मुलामुलींचं एक मी संमेलनदेखील घेतलं होतं आणि त्यांची प्रत्येकाची जी कथा होती, ही अतिशय प्रेरणादायी होती. संघर्षातून माणूस काय करू शकतो, हे पाहताना मला खूप समाधान वाटलं.

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा