मुंबई, दि. 27 :  दुष्काळग्रस्तांसाठी डोंबिवलीकरांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 1 कोटी 88 लाख 11 हजार 710 भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे धनादेश केले सुपूर्द

राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी त्यांच्या डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक, नागरिक आणि उद्योजक यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दिलेल्या 1 कोटी 88 लाख 11 हजार 710 रुपये देणगीचे 110 धनादेश मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केले.

या संदर्भात श्री. चव्हाण यांनी केलेल्या आवाहनाला डोंबिवली विधानसभा मतदार संघातील नागरिकांनी उस्फुर्त आणि सकारात्मक प्रतिसाद दिल्याने हा निधी अल्पावधीत गोळा झाला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या जनसहभागासाठी सर्वांचे आभार मानले.

 

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा