मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार; पी. चिदंबरम यांच्यावर घणाघाती टीका
मुंबई, दि. 25 : महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांना पणाघाती प्रत्युत्तर दिले आहे. “प्रिय पी. चिदंबरमजी, मलाही निवडक स्मरणशक्तीचा कलाविष्कार आत्मसात करायचा आहे.” अशा बोचया शब्दांत फडणवीस यांनी चिदंबरम यांच्यावर निशाणा साधला.
फडणवीस यांनी म्हटले आहे की, “२०२३ मधील १०६वी घटनादुरुस्ती म्हणजेच ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ आपण वाचला आणि त्याला मतदानही वेले आहे. या कायद्यात महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी स्पष्ट पूर्वअट नमूद करण्यात आली आहे. महिलांसाठी राखीव जागांची तरतूद मतदारसंघ पुनर्रचनेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच लागू होईल आणि ही पुनर्रचना कायदा लागू झाल्यानंतर घेतल्या जाणाऱ्या पहिल्या जनगणनेच्या आधारे केली जाईल, अशी तरतूद आहे.”
“कोविड’ मुळे जनगणना लांबली, हे आपण सर्व जाणतो. कायदा लागू झाल्यानंतरची जनगणना आणि त्यानंतरची मतदारसंघ २०२९ मध्ये महिलांना आरक्षण देणारच पुनर्रचना पूर्ण होईपर्यंत प्रतीक्षा केल्यास २०२९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महिला आरक्षण लागू होऊ शकणार नाही,” असे फडणवीस यांनी म्हटले आहे.
“यामुळे २०२९च्या लोकसभा निवडणुकीतच महिला आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी केंद्र सरकारने २०२६ मध्ये २०११च्या आधीच प्रकाशित झालेल्या जनगणना आकडेवारीच्या आधारे मतदारसंघ पुनर्रचना करण्याचा मार्ग मोकळा करणे, लोकसभेची सदस्यसंख्या वाढविणे आणि महिला आरक्षण प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक पावले उचलण्याच्या दिशेने विधेयके आणली,” असा दावा फडणवीस यांनी केला.
मात्र, या प्रयत्नांना राहुल गांधी आणि काँग्रेसने विरोध केल्याचा आरोप करत फडणवीस म्हणाले, “तुमचे नेते राहुल गांधी आणि काँग्रेसने या प्रयत्नाला विरोध केला आणि संसदेत त्याचा पराभव सुनिश्चित केला. त्यामुळे २०२९ पर्यंत महिला आरक्षण लागू करण्याचा मार्गच रोखला गेला.”
२०२३ मध्ये काँग्रेसने १०६व्या घटनादुरुस्तीला दिलेल्या पाठिंब्यावरही फडणवीस यांनी जोरदार टीका केली. “२०२३ मध्ये तुम्ही या घटनादुरुस्तीला पाठिंबा दिलात, कारण ‘एनडीए’कडे पुरेसे संख्याबळ होते आणि तुमच्या पाठिंब्याशिवायही हे विधेयक मंजूर होणार होते. त्यामुळे ‘बहती गंगा में हाथ धो लो’ अशी भूमिका घेतली,” असा टोला त्यांनी लगावला. “पण महिला आरक्षणाच्या लवकर अंमलबजावणीची खरी संधी निर्माण झाली, त्याक्षणी काँग्रेसचे खरे रंग समोर आले,” असा घणाघात फडणवीस यांनी केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महिला आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या सरकारच्या निर्धाराचा पुनरुच्चार करत फडणवीस म्हणाले, “आमचे नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी २०२९च्या लोकसभा निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करण्यासाझी कोणतीही कसर सोडणार नाहीत.” अखेर फडणवीस यांनी काँग्रेसला थेट जाब विचारत म्हटले, “पुन्हा सांगतो, इधर-उधर की बात ना करो। हे सांगा, आमच्या माता-भगिनींचा हक्क का रोखला?”











































































