भाजपा मुंबई अध्यक्ष अमीत साटम यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल

मुंबई, दि. 22 : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर भाजप मुंबई अध्यक्ष आ. अमीत साटम यांनी जोरदार हल्लाबोल केला. देशातील ‘जेन-झी’ आणि ‘जेन नेक्स्ट’ विकसित भारताच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहेत. त्यामुळे राहुल गांधींना या पिढीकडून प्रतिसाद मिळणार नाही, असा दावा साटम यांनी केला.

राहुल गांधी यांच्या कार्यक्रमावर टीका करताना साटम यांनी विद्यार्थ्यांना पैसे देऊन गर्दी जमवली जात असल्याचा आरोप केला. ‘अँटी -इंडिया’ गँगकडून मिळालेल्या फंडातून विद्यार्थ्यांना प्रत्येकी २५ हजार रुपये देऊन कार्यक्रमाला आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

राहुल गांधींना चांगलेच माहीत आहे की, देशातील ‘जेन-झी’ आणि ‘जेन नेक्स्ट’ विकसित भारताच्या दिशेने पुढे जात आहे. त्यामुळे या पिढीचा प्रतिसाद मिळणार नाही. म्हणूनच, ‘अँटी -इंडिया फोर्सेस’ सोबत हातमिळवणी करून देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

अशा प्रकारच्या राजकारणापासून राहुल गांधी यांनी दूर राहावे, असा इशाराही त्यांनी दिला. देशातील ‘जेन-झी’ आणि ‘जेन-नेक्स्ट’ तुम्हाला असा धक्का देईल की, त्याची गुंज भविष्यातही ऐकू येईल.

https://x.com/AmeetSatam/status/2090708312946037012?s=20

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा