भाजप नाशिक महानगरातर्फे आयोजन; पालकमंत्री गिरीशजी महाजनांची प्रमुख उपस्थिती
नाशिक, दि. 8 : भारतीय जनता पार्टी नाशिक महानगराच्या वतीने देशाचे यशस्वी पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत विकसित भारत संकल्प सभा व सेवा ज्योती यात्रा’ बुधवार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी मोठ्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
भाजपा वसंतस्मृती कार्यालय, नाशिक येथे आयोजित विकसित भारत संकल्प सभेस महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री, कुंभमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. श्री. गिरीशजी महाजन यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी त्यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ‘विकसित भारत @ 2047’ या पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेमध्ये प्रत्येक नागरिकाने आणि कार्यकर्त्याने सक्रिय सहभाग नोंदवून राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात योगदान देण्याचे आवाहन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना ना. गिरीशजी महाजन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आपल्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवासंकल्पातून देशाच्या विकासाला नवी दिशा दिली आहे. केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजना आणि विकासकामांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचे काम सुरू आहे. भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनविण्याचे ध्येय पंतप्रधान मोदीजींनी देशासमोर ठेवले असून, हे ध्येय पूर्ण करण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने सक्रिय सहभाग घेणे आवश्यक आहे. सेवा, संघटन आणि राष्ट्रनिर्माणाच्या भावनेतून भाजप कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचून या संकल्पनेला व्यापक जनसहभाग मिळवून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी कार्यक्रमास भाजपा नाशिक महानगरचे अध्यक्ष मा. सुनील केदार, माजी आमदार निशिगंधाताई मोगल, आमदार प्रा. देवयानीताई फरांदे, आमदार सौ. सीमाताई हिरे,आमदार श्री राहुल ढिकले, महापौर मा. सौ. हिमगौरी आडके, जेष्ठ नेते विजय साने, महेश हिरे,भाजपा नाशिक महानगरचे सरचिटणीस सुनील देसाई,मनपा गटनेते श्याम बडोदे, सरचिटणीस सौ. रश्मीताई हिरे-बेंडाळे, मनपा नगरसेवक- नगरसेविका, नाना शिलेदार,युवा मोर्चाचे अध्यक्ष श्री. प्रवीणजी भाटे, महिला मोर्चा अध्यक्ष स्वाती भामरे, श्री.प्रशांत वाघ, सर्व मंडलांचे अध्यक्ष, पदाधिकारी, विविध आघाड्या व मोर्चांचे पदाधिकारी तसेच भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान सेवा संकल्प अभियान आणि सेवा ज्योती यात्रेच्या निमित्ताने समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या श्रीमती सविता झुंबर दातीर यांचा यावेळी गौरव करण्यात आला. तसेच क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे एशियन गेम्समधील कबड्डीपटू, छत्रपती पुरस्कार व महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेते आकाश शिंदे, नेमबाजी क्षेत्रातील छत्रपती पुरस्कार विजेत्या श्रीमती श्रद्धा नालमवार,शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदानाबद्दल महानगरपालिकेच्या शिक्षिका सौ. कुंदा जयवंत बच्छाव यांना राष्ट्रपती पुरस्कार २०२६ प्राप्त यासर्वांचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी ‘विकसित भारत’ रील स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘विकसित भारत’ या संकल्पनेवर आधारित रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला युवा वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत उत्कृष्ट रील तयार केल्याबद्दल शुभम वाघ, सार्थक पाबळे आणि तन्मय साबळे यांचा ना. गिरीशजी महाजन यांच्या हस्ते बक्षीस व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. युवा पिढीने सोशल मीडियाच्या माध्यमातून विकसित भारताची संकल्पना, देशातील विकासकामे आणि राष्ट्रनिर्माणाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी पुढाकार घ्यावा, असा संदेश यावेळी देण्यात आला.
‘सेवा ज्योती कलश यात्रा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
विकसित भारत संकल्प सभा संपन्न झाल्यानंतर ‘सेवा ज्योती कलश यात्रे’ला सुरुवात करण्यात आली. सेवा, समर्पण आणि राष्ट्रनिर्माणाचा संदेश देणाऱ्या या यात्रेत भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. ही सेवा ज्योती कलश यात्रा ईदगाह मैदान मार्गे अनंत कान्हेरे मैदानापर्यंत नेण्यात आली. यात्रेदरम्यान कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आणि जोश पाहायला मिळाला. ‘सेवा हीच साधना, जनसेवा हीच राष्ट्रसेवा’ या भावनेतून सेवा कार्याचा संदेश देण्यात आला. यात्रेच्या समारोपप्रसंगी अनंत कान्हेरे मैदान येथे आयोजित रांगोळी प्रदर्शनाला ना. गिरीशजी महाजन यांनी भेट देऊन कलाकारांचे कौतुक केले. विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रभक्तीपर विषयांवर साकारलेल्या रांगोळ्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
सेवा, संघटन आणि राष्ट्रनिर्माणाचा संकल्प
भाजपा नाशिक महानगराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमातून सेवा, संघटन, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रनिर्माण या मूल्यांना अधिक बळ देण्याचा संदेश देण्यात आला. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत वेगाने विकसित राष्ट्राच्या दिशेने वाटचाल करत असून, ‘विकसित भारत @ 2047’ या संकल्पपूर्तीसाठी नाशिक महानगरातील भाजपा कार्यकर्ते समाजातील विविध घटकांना सोबत घेऊन कार्य करतील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान, युवकांना प्रोत्साहन, जनजागृती आणि राष्ट्रनिर्माणाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प भाजपा नाशिक महानगराने केला आहे. या संपूर्ण कार्यक्रमास भाजपा पदाधिकारी, लोकप्रतिनिधी,मंडल अध्यक्ष,विविध आघाड्या-मोर्चांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
































































