मुंबई, दि. 30 : ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान २०२६’ अंतर्गत नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष आणि उपाध्यक्षांसाठी आयोजित राज्यस्तरीय प्रशिक्षण वर्ग रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे यशस्वीरीत्या संपन्न झाला.

समाजातील प्रत्येक घटकाच्या कल्याणासाठी आपले सरकार विविध लोककल्याणकारी योजना राबवत आहे. या योजनांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी समर्पित भावनेने काम करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी उपस्थितांना केले.

यावेळी राष्ट्रीय सह संघटन मंत्री आदरणीय शिवप्रकाशजी, प्रदेश सरचिटणीस आ. माधवीताई नाईक, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश सरचिटणीस सुनील राणे, भाजपा मुख्यालय प्रभारी रवि अनासपुरे यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा