नवी दिल्ली, दि. 1 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर धोका समोर असतानाही आणि स्वतः गंभीर जखमी झाल्यानंतरही इतरांचे प्राण वाचवण्यासाठी दाखवलेल्या अतुलनीय धैर्य आणि अढळ निर्धाराबद्दल कॅप्टन स्मित माछर यांचे कौतुक केले. कॅप्टन माछर यांच्या शौर्यामुळे शेकडो लोकांचे प्राण वाचवता आले आणि मोठी दुर्घटना टाळता आली. कॅप्टन माछर यांचा भारताला अभिमान आहे. त्यांच्या जलद प्रकृतीसुधारणा, नव्या बळासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करत असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. आज इस्रायलच्या पंतप्रधानांनीही म्हटले की, “या हिंदुस्थानीने 9/11 सारखी घटना घडण्यापासून रोखली.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’ वरील पोस्टमध्ये सांगितले:
“कॅप्टन स्मित माछर हे खरे नायक आहेत. अत्यंत गंभीर धोका समोर असतानाही आणि स्वतः गंभीर जखमी झाल्यानंतरही त्यांनी इतरांचे प्राण वाचवण्यासाठी अतुलनीय धैर्य आणि अढळ निर्धार दाखवला. त्यांच्या शौर्यामुळे शेकडो लोकांचे प्राण वाचवता आले आणि मोठी दुर्घटना टाळता आली. कॅप्टन माछर यांचा भारताला अभिमान आहे. त्यांच्या जलद प्रकृतीसुधारणा, नव्या बळासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना.”





























