मुंबई, दि. 18 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्ताने लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात देशातील काही व्यक्ती, शक्ती नक्षली बुद्धीच्या आहेत (दिमागी नक्षली) असा उल्लेख केला. त्यामुळे अनेकांच्या अंगाचा तिळपापड होऊ लागला आहे. अरविंद केजरीवाल, पी. चिदंबरम यासारख्या नेत्यांनी आम्ही नक्षली आहोत आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे, अशा अर्थाचा उल्लेख असणाऱ्या पोस्ट समाजमाध्यमांवर प्रसिद्ध होत आहेत. याचाच अर्थ पंतप्रधानांनी केलेला उल्लेख या मंडळींना चांगलाच खुपला आहे. भारतात नक्षलवाद्यांचा उदय कसा झाला आणि त्यांनी केलेल्या हिंसाचारात हजारो निरपराध व्यक्तींचे बळी कसे गेले याची माहिती नव्या पिढीला नाही. म्हणनूच नक्षलावादामुळे देशाला किती मोठे नुकसान सहन करावे लागले आहे, याची माहिती सध्याच्या ‘जेन झी’ला देणे आवश्यक आहे. सध्याच्या ‘जेन झी’ला दहशतवाद्यांनी देशात २००४ ते २०१४ कसा धुमाकूळ घातला होता याचीही कल्पना नाही. अत्यंत सुरक्षित वातावरणात, प्रगत तंत्रज्ञानाच्या काळात सध्याची ‘जेन झी’ वाढली आहे. आपण कळते होण्याच्या अगोदर सोनिया आणि राहुल गांधींच्या राज्यात, देशात पाकिस्तानी नक्षलावांद्याचे आणि दहशतवाद्यांचे राज्य होते, याची माहिती नसलेल्या ‘जेन झी’ला नक्षलवादाचा थोडक्यात इतिहास कळलाच पाहिजे. नक्षलावादाचा उदय सरकारी यंत्रणेच्या अत्याचाराविरोधात आणि जमीनदार, सावकार यांच्या दडपशाहीविरोधात झाला होता. नक्षलवाद्यांनी सरकारी यंत्रणा आणि प्रस्थापितांविरोधात सशस्त्र उठाव करण्यास प्रवृत्त केले .त्यामुळे पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, तेलंगणा, छत्तीसगड, महाराष्ट्र अशा अनेक राज्यांत सशस्त्र नक्षलवाद्यांनी निरपराध सामान्यांचे आणि पोलीस कर्मचाऱ्यांचे बळी घेतले. पोलीस , सरकारी कर्मचारी , जमीनदार अत्याचार करीत असतील तर त्याविरोधात दाद मागण्याचा कायदेशीर मार्ग डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाने उपलब्ध करून दिला आहे .
मात्र त्यावर नक्षलवाद्यांचा विश्वास नाही . २००४ ते २०१४ या काळात नक्षलवाद आणि दहशतवाद उच्चांकी स्तरावर पोहचला होता. मनमोहन सिंग सरकार असताना नक्षलवाद्यांच्या हिंसाचारात हजारो जण ठार झाले. २०१४ मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर नक्षलवाद्यांविरोधात कडक कारवाई सुरू झाली. त्यामुळे नक्षलवादी शक्तींनी जंगलातून पळ काढत शहरांना आपले लक्ष्य केले. विविध जाती – जमातींत अफवा गैरसमज पसरवून दंगे घडविणे हे शहरी भागातील नक्षलवाद्यांचे उद्दिष्ट होते . २०१८ मध्ये भीमा कोरेगाव येथे झालेला हिंसाचार आणि नवी मुंबईत पोलिसांवर झालेली दगडफेक , जाळपोळ ही शहरी नक्षलवाद्यांच्या कारवायांची मोठी उदाहरणे आहेत . नवी दिल्लीत शाहिनबाग आंदोलनावेळी अनेक दिवस रस्ते अडविण्यात आले. त्यानंतर दिल्लीत दंगल झाली , यात प्रमुख आरोपी होता आम आदमी पक्षाचा नगरसेवक ताहीर हुसेन. विद्यार्थी आंदोलनात पोलिसांनी संसदेवर मोर्चा काढण्यास परवानगी दिली नसताना मोर्चा काढला गेला , अनेक पोलिसांना मारहाण केली गेली , पोलिसांच्या अनेक वाहनांचे नुकसान केले गेले. पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबार करावा असाच उद्देश दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनात घुसलेल्या नक्षलवादी शक्तींचा होता . दिल्लीतील आंदोलनात उतरलेल्या संघटनांपैकी एकही संघटना झारखंडमधील आंदोलनात सहभागी झाली नाही , हे लक्षात घ्या . मोदी सरकारविरुद्ध आंदोलन करून हिंसाचार व्हावा अशा पद्धतीने आंदोलने करणे हाच नक्षली शक्तींचा सध्याचा हेतू आहे . त्यामुळेच केजरीवाल , चिदंबरम यांच्या सारख्यांना पंतप्रधान मोदीजींच्या वक्तव्यांमुळे मिरची लागली .



























