नवी दिल्ली, दि. 29 : रक्षाबंधनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या. हा शुभ सण सर्वांच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि यश घेऊन येवो, अशा सदिच्छा मोदींनी व्यक्त केल्या. दरवर्षीप्रमाणे यंदाही शाळकरी मुलींनी पंतप्रधानांच्या अधिकृत निवासस्थानी मोदींना राखी बांधली. पंतप्रधानांनी इन्स्टाग्रामवर राखी बांधत असल्याचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले. या व्हिडिओमध्ये ते विद्यार्थिनीसोबत मनमोकळेपणाने संवाद साधताना, हस्तांदोलन करताना आणि त्यांच्याशी ‘हाय-फाइव्ह’ करताना दिसतात. ‘७, एलकेएम येथील आजच्या रक्षाबंधन सोहळ्यात हाय-फाइव्ह, हास्य आणि बरंच काही’ असे मोदींनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले. यावेळी एका शाळकरी मुलीने पंतप्रधानांना त्यांच्या बालपणीचे स्वप्न काय होते, असा प्रश्न विचारला. यावर मोदींनी’ तुम्हाला भेटणे’ असे उत्तर देताच एकच हशा पिकला.



























