नवी दिल्ली , दि. 23 : नवी दिल्ली येथील भाजप मुख्यालयात आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या गरिमामय उपस्थितीत पक्षाच्या नवनियुक्त राष्ट्रीय पदाधिकारी यांची बैठक पार पडली. विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन म्हणाले, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे मार्गदर्शन प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये नव्या ऊर्जेचा संचार करते आणि राष्ट्रसेवेचा संकल्प अधिक दृढ करते. त्यांच्या नेतृत्वाखाली ‘विकसित भारत २०४७’ हे ध्येय साध्य करण्यासाठी संघटनेतील प्रत्येक कार्यकर्ता पूर्ण समर्पण आणि निष्ठेने आपल्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी संकल्पबद्ध आहे.



























