मुंबई, दि. 18 : भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस खा. विनोद तावडे यांची उत्तर प्रदेशचे प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. नितीन नबीन यांनी उत्तर प्रदेश, पंजाब आणि गुजरातच्या संघटना प्रभारी आणि सहप्रभारींच्या नियुक्तया जाहीर केल्या आहेत. पंजाबचे प्रभारी म्हणून राष्ट्रीय सरचिटणीस खा. डॉ. सतीश पुनिया यांची तर गुजरातच्या प्रभारीपदी राष्ट्रीय कार्यालय प्रभारी खा. तरुण चुग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या सहप्रभारीपदी राष्ट्रीय सचिव जगदिश पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.



























