प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिनी भाजप युवा नेते विशाल परब यांचा उपक्रम
वेंगुर्ले, (सिंधुदुर्ग) दि. 21 : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. याच सामाजिक बांधिलकीचा एक भाग म्हणून भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ला शहरातील क्षयरोगग्रस्त (TB) रुग्णांसाठी आरोग्यविषयक मदतीचा उपक्रम राबविण्यात आता.
क्षयरोगाच्या उपचारासाठी रुग्णांना दीर्घकाळ औषधोपचार घ्यावे लागतात. या काळात ओषधोपचारासोबतच पोषण, दैनंदिन गरजा आणि घरगुती खर्चाचा भार अनेक रुग्ण व त्यांच्या कुटुंबीयांसाठी आव्हानात्मक ठरतो. ही गरज लक्षात घेऊन गरजू क्षयरोगग्रस्त रुग्णांना उपचाराच्या काळात आधार मिळावा, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला.
यावेळी क्षयरोगग्रस्त रुग्णांना आरोग्यविषयक मदतीसोबतच आवश्यक घरगुती साहित्याचे ही वाटप करण्यात आले. उपचाराच्या काळात रुग्णांना दैनंदिन जीवनात काही प्रमाणात दिलासा मिळावा आणि त्यांच्या कुटुंबावरीत आर्थिक भार कमी व्हावा, यासाठी या मदतीचा हातभार लागणार आहे.
‘सेवा हीच खरी सामाजिक बांधिलकी’ या भावनेतून भाजपचे युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. वाढदिवसाचा उत्सव केवळ शुभेच्छांपुरता मर्यादित न ठेवता तो सामाजिक सेवेशी जोडण्याचा प्रयत्र या उपक्रमातून करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब, उपनगराध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रसत्रा उर्फ बाळू देसाई, साईप्रसाद नाईक, मनवेत फर्नांडिस, नगरसेवक शितल आगचेकर, रिया केरकर, काजत कुबल, सुधीर पातयेकर, सचिन शेटये, किरण कुवत, साईप्रसाद भोई यांच्यासहित वेद्यकीय अधिकारी उपस्थित होते.





















































