कोकणातील माणूस जसा आपल्या मातीशी घट्ट जोडलेला असतो, जसे समुद्रकिनाऱ्यावरील लाटेचे आणि मातीचे नाते अतूट असते, तसेच कोकणातील माणसांचे साधे भोळे आणि काळजात शहाळ्यासारखी गोडवा जपणारे व्यक्तिमत्व म्हणजे रविंद्र चव्हाण.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीच्या विचारसरणीचा प्रभाव असलेले निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून रविंद्र चव्हाण यांची ओळख महाराष्ट्राला आहे. त्यांचा जन्म २० सप्टेंबर १९७० रोजी मुंबईतील भांडुप येथे झाला. त्यांचे वडील दत्तात्रय चव्हाण हे नोकरीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील पेंडूर या गावातून मुंबईत आले होते. महाविद्यालयीन जीवनापासूनच संघ आणि भाजपच्या विचारांनी भारलेले रविंद्रजी आणि त्यांच्या कुटुंबाने त्यानंतर डोंबिवली येथे स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.
सामान्य कार्यकर्ता ते महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हा त्यांचा प्रवास प्रेरणादायी आहे. २००२ मध्ये भाजप युवा मोर्चाच्या कल्याण जिल्हाध्यक्ष पदापासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा विजय मिळवत जनतेचा विश्वास संपादन केला.
रविंद्र चव्हाण यांनी ‘डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार’ ह्या नावाचे संस्थात्मक काम उभे केले आहे. त्या मध्ये दर महिन्याला एक त्याच नावाचे एक मासिक प्रसिद्ध होते. त्या मासिकाला अनेकदा महाराष्ट्र स्तरावर मान्यवर पुरस्कार मिळालेले आहेत. दरवर्षी विविध क्षेत्रातील निवडक डोंबिवलीकर नागरिकांना ‘आदर्श पुरस्कार’ देऊन गौरविले जाते. देखणे गुलाब प्रदर्शन भरविले जाते. त्याचचरोबर आधार कार्ड, रेशन कार्ड, आरोग्य सेवा कार्ड, वरिष्ठ नागरिक कार्ड अशा सेवा सातत्याने पुरविण्याची व्यवस्थाही त्यांनी केली आहे. स्वा. सावरकर उद्यानात स्वा. सावरकरांचा फोटो ठेवुन तिथे अखंड ज्योत तेवत ठेवण्याची व्यवस्था सुद्धा त्यांनी केलेली आहे.
या प्रवासात त्यांनी मंत्री म्हणूनही आपली वेगळी छाप सोडली. अन्न नागरी पुरवठा मंत्री असताना २०२२ मध्ये त्यांनी सुरू केलेला आनंदाचा शिधा हा उपक्रम आर्थिकदृष्ट्या बंचित कुटुंबांसाठी मोठा आधार ठरला. कोकणातील मंदिरांना पायाभूत सुविधा देण्याचे काम असो, सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून २०२१ ते २०२३ या काळात तब्बल ९२००० कोटी रुपयांची विकासकामे पूर्ण करण्याची दूरदृष्टी असो, किंवा २०२४ मध्ये सत्तर बेघर कातकरी कुटुंबांचे पुनर्वसन करून त्यांना हक्काची घरे आणि जमीन मिळवून देण्याची संवेदनशीलता असो, त्यांचे कार्य नेहमीच सर्वसामान्यांच्या हिताचे राहिले आहे. कल्याण डोंचिवलीच्या विस्तारासाठी आणि पालघर रायगडचे पालकमंत्री म्हणूनही त्यांनी प्रशंसनीय कामगिरी केली आहे.
लोकसभा निवडणुकीत कोकणचे खासदार आदरणीय श्री नारायणराव राणे यांना निवडून आणण्यासाठी त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. यामध्ये सिंधुदुर्गचे मंत्री आदरणीय श्री नितेश राणे यांचे सहकार्य त्यांना वेळोवेळी लाभले.
प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर २० सप्टेंबर २०२५ ते २० सप्टेंबर २०२६ या एका वर्षाचा कार्यकाळ हा भाजपच्या संघटनात्मक इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल असा ठरला. या काळात त्यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्यात आल्या आणि त्यात भाजपला अभूतपूर्व यश मिळाले. ग्रामपंचायत निवडणुकांपासून ते महानगरपालिका निवडणुकांपर्यंत प्रत्येक ठिकाणी भाजपचा झेंडा डौलाने फडकला. ग्रामीण भागातील ग्रामपंचायतींमध्ये सामान्य कार्यकर्त्याला ताकद देऊन भाजपने मोठ्या संख्येने सरपंच आणि सदस्य निवडून आणले, तर शहरी भागातील महानगरपालिका निवडणुकांमध्येही भाजपला प्रचंड ऐतिहासिक विजय मिळवून देण्याचे श्रेय त्यांच्या नियोजनबद्ध नेतृत्वाला जाते.
या विजयामागे केवळ रणनीती नाही तर विचारांची दृढता आहे. रविंद्र चव्हाण यांनी नेहमीच कार्यकर्त्यांना एकच मार्गदर्शन केले आहे की राष्ट्रनिर्माणाचा विचार जनतेच्या मनात अधिक दृढ झाला पाहिजे. भाजप हा केवळ निवडणूक लढवणारा पक्ष नाही तर तो राष्ट्रनिर्माणाचे आंदोलन आहे ही भावना त्यांनी तळागाळापर्यंत पोहोचवली. त्यासाठी आपले प्रेरणास्थान असलेल्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे बलिदान आणि एकात्मतेचा विचार आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांचा अंत्योदय आणि एकात्म मानववादाचा मंत्र जनमानसात रुजविण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करुया असा संदेश त्यांनी दिला. श्यामाप्रसादजींनी देशाच्या अखंडतेसाठी दिलेले बलिदान आणि दीनदयालजींनी शेवटच्या माणसाच्या कल्याणासाठी मांडलेला विचार हाच आपल्या कार्याचा आत्मा आहे. हा विचार घरोघरी पोहोचवून आपण सर्वांनी एकात्मता दाखवूया हेच त्यांचे कार्यकर्त्यांना आवाहन आहे.
अंत्योदयाच्या मंत्राला प्रत्यक्षात आणत शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील केंद्र आणि राज्य सरकारच्या असंख्य कल्याणकारी योजना त्यांनी कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवल्या.
२००२ मध्ये सुरू झालेला एका सामान्य कार्यकर्त्याचा प्रवास आज महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत पोहोचला याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. भाजप आगे बढो हे ब्रीदवाक्य त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये रुजवले. कोकणातील माणूस जसा आपल्या मातीशी घट्ट जोडलेला असतो, जसे समुद्रकिनाऱ्यावरील लाटेचे आणि मातीचे नाते अतूट असते, तसेच कोकणातील माणसांचे साधे भोळे आणि काळजात शहाळ्यासारखी गोडवा जपणारे व्यक्तिमत्व म्हणजे रविंद्र चव्हाण.
नाशिक ही माझी कर्मभूमी असली तरी माझे मूळ गाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण नडगिवे आहे. खारेपाटण नडगिवे पासून ते पेंडूर पर्यंत पसरलेली हीच कोकणची माती आहे जिने आम्हाला रविंद्र चव्हाण यांच्यासारखे नेतृत्व दिले. एकाच जिल्ह्याचे सुपुत्र म्हणून आणि दोन वेळा प्रत्यक्ष भेटीचा योग आल्याने त्यांच्या साधेपणाचा आणि कणखर नेतृत्वाचा मी साक्षीदार आहे, याचा मला विशेष जिव्हाळा आणि अभिमान आहे. ते कोकणचे सुपुत्र असणे हा संपूर्ण कोकणवासीयांसाठी आणि माझ्यासारख्या सिंधुदुर्गच्या कार्यकर्त्यासाठी मोठा सन्मान आहे.
नवनिर्वाचित भाजपा प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री रविंद्र चव्हाण यांना २० सप्टेंबर रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमित्त मनापासून अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा. त्यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रनिर्माणाचा विचार अधिक दृढ होऊन भाजपा अधिक सशक्त होईल आणि देश विकसित, सुरक्षित आणि मजबूत करण्याच्या ध्येयाकडे वाटचाल करेल हा विश्वास आहे.
(भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रदीप पाटील)
















