गेल्या वर्षी याच पहिल्या तिमाहीत म्हणजे Q1 मध्ये भारताचा GDP वाढीचा दर 6.9% होता. आता तो वाढून थेट 7.8% झाला आहे. पण राहुल गांधी सारख्या ब्रेन डेड विरोधकांना GDP वाढल्याचं सांगितलं की लगेच एकच प्रश्न “आम्हाला कुठे दिसतोय विकास?” मग त्यांच्यासाठी थोडं सोप्या भाषेत सांगूया. कदाचित आकड्याची उजळणी समजायला मदत होईल.
रिअल इस्टेट वाढ 24.7% : आज शहराशहरात नवीन इमारती, फ्लॅट्स, कमर्शियल प्रोजेक्ट्स आणि बांधकामं सुरू आहेत. लोक घरं खरेदी करत आहेत, गुंतवणूक करत आहेत. याचा अर्थ लोकांकडे पैसा आला आहे. लोक घर खरेदी पासून ते ऑफिसेस देखील खरेदी करत आहेत. पण ब्रेन डेड विरोधकांना हे दिसत नाही, कारण त्यांचं लक्ष अजूनही फक्त पत्रकार परिषदांच्या MM वर म्हणजे माईक आणि मनुस्मृती यावरच आहे.
बँकिंग क्षेत्र वाढ 11.4% : बघा सायकल कशी फिरते थोडक्यात आपण त्याला अर्थचक्र म्हणू इकॉनॉमिक्सच्या भाषेत. घरासाठी कर्ज, गाडीसाठी कर्ज, व्यवसायासाठी कर्ज, उद्योगासाठी भांडवल बँकिंग व्यवहार मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. अर्थव्यवस्थेत पैसा फिरतोय, व्यवहार वाढत आहेत. पण, विरोधकांच्या मते बहुतेक बँकांमध्येही “मंदी” च सुरू असावी.
मॅन्युफॅक्चरिंग मध्ये 8.3% वरून 9.2% वाढ : कारखान्यांमध्ये उत्पादन वाढलं आहे. मोबाईल, वाहनं, कपडे आणि इतर वस्तूंची मागणी वाढल्यामुळे कंपन्या अधिक उत्पादन करत आहेत. कारखाने चालू आहेत, उत्पादन वाढतंय…पण विरोधकांचा एकच कारखाना मात्र 24 तास सुरू आहे नकारात्मकतेचं उत्पादन.
रोड ट्रान्सपोर्ट वाढ 9.7% : नवीन रस्ते, महामार्ग, वाढती मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक यामुळे रोड ट्रान्सपोर्ट क्षेत्राची वाढ 9.7% झाली आहे. ट्रक देशभर माल पोहोचवत आहेत, रस्त्यांवर आर्थिक हालचाल वाढली आहे. विरोधकांना लाखो किलोमीटर रस्त्यावरील 4 इंचाचा खड्डा दिसतो. रस्ते खराब असतील तर एवढा ट्रान्सपोर्ट कसा वाढेल.
वेअरहाऊस वाढ 11.8% : ऑनलाईन शॉपिंग, ई-कॉमर्स आणि मोठ्या कंपन्यांच्या सप्लाय चेनमुळे गोदामांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. वेअरहाऊस भरत आहेत, मालाची उलाढाल वाढतेय…
पण विरोधकांकडे अजूनही एकच स्टॉक भरपूर आहे खोट्या आरोपांचा.
7.8% GDP वाढ ही फॅक्ट आहे. स्वप्न नाही. घरांची बांधकामं वाढत आहेत, कारखान्यांचं उत्पादन वाढत आहे, बँकिंग व्यवहार वाढत आहेत, मालवाहतूक वाढतेय, गोदामांची मागणी वाढतेय. म्हणजे अर्थव्यवस्थेचं चक्र वेगाने फिरत आहे.
– प्रकाश गाडे














