घर देणारा आपल्या हक्काचा माणूस देवाभाऊ…
मुंबई देशाची आर्थिक राजधानी आणि लाखो लोकांच्या स्वप्नांना पंख देणारे शहर. पण याच मुंबईच्या मध्यभागी वसलेली ‘धारावी’ अनेक दशकांपासून केवळ एका झोपडपट्टीच्या ओळखीपुरती मर्यादित राहिली होती. अनेक सरकारे आली, अनेक निवडणुका झाल्या आणि धारावीच्या विकासाच्या घोषणाही झाल्या. परंतु, घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यातील अंतर नेहमीच सर्वसामान्य धारावीकरांना सोसावे लागले. आता मात्र हे चित्र पूर्णपणे बदलताना दिसत आहे.
या अशक्य वाटणाऱ्या प्रकल्पाला प्रत्यक्षात आणण्याचे आणि निवडणुकांपुरत्या घोषणा करण्याच्या जुन्या राजकीय संस्कृतीला छेद देण्याचे मुख्य श्रेय मुख्यमंत्री Devendra Fadnavis जी यांना जाते. त्यांच्या दृढ राजकीय इच्छाशक्तीमुळे आणि दूरदृष्टी नेतृत्वामुळेच आज धारावीचा कायापालट प्रत्यक्ष जमिनीवर उतरताना दिसत आहे. काल उद्घाटन झालेले ‘धारावी एक्सपिरियन्स सेंटर’ हे केवळ एक इमारत नाही, तर देवेंद्रजींच्या गतिमान प्रशासनाचे आणि आधुनिक मुंबईच्या स्वप्नाचे जिवंत प्रतीक आहे.
या संपूर्ण प्रकल्पात देवेंद्रजी फडणवीस यांनी गोरगरीब जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. धारावीतील कष्टकरी, मजूर आणि सर्वसामान्य रहिवाशांना ३५० आणि ५०० चौरस फुटांची हक्काची, सुसज्ज घरे मिळवून देण्यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय ऐतिहासिक आहेत. सॅम्पल फ्लॅट्सच्या माध्यमातून रहिवाशांना त्यांच्या भावी घराचा प्रत्यक्ष अनुभव घेता येत आहे, ज्यामुळे पारदर्शकता आणि लोकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे. जेंव्हा सर्वसामान्यांना देण्याची वेळ येते तेंव्हा देवेंद्रजी राजकारण बाजूला ठेवून, प्रत्यक्ष अंमलबजावणीवर भर देण्याच्या त्यांच्या कार्यशैलीमुळेच आज धारावीकरांना हक्काच्या छताची शाश्वती मिळाली आहे.
हा प्रकल्प केवळ घरे बांधण्यापुरता मर्यादित नाही. मुंबई शहराला झोपडपट्टीमुक्त करून एक जागतिक दर्जाचे आधुनिक शहर बनवतानाच, मिठी नदीचे पुनरुज्जीवन, ३.३ किमीचा सुंदर रिव्हरफ्रंट आणि ४० हजार झाडांची लागवड करून पर्यावरणपूरक विकासाचा समतोल साधला जात आहे. वर्षानुवर्षे पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या धारावीतील जनतेला सन्मानाचे जीवन आणि मुलांच्या उज्वल भविष्यासाठी दर्जेदार पायाभूत सुविधा मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. देवेंद्रजी फडणवीस यांच्या याच लोकहितैषी इच्छाशक्तीच्या जोरावर मुंबई खऱ्या अर्थाने एका नव्या, आधुनिक आणि झोपडपट्टीमुक्त युगाकडे यशस्वी वाटचाल करत आहे.
– प्रकाश गाडे

















