नवी दिल्ली, दि. 31 : ‘नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत’ हे अभियान सध्या संपूर्ण देशात जोमाने सुरू आहे. ‘मन की बात’ कार्यक्रमात मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी ‘नशामुक्त भारत’ हा संकल्प जनसहभागातून अधिक बळकट करण्याचे आवाहन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा म्हणाले, आपले अनेक युवा मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी होत आहेत. भारतातील युवकांचे आरोग्य, आनंदी जीवनशैली आणि उज्ज्वल भविष्य यासाठी हा आपल्या सर्वांचा सामूहिक संकल्प आहे.
आपल्या देशात उत्कृष्ट कंटेंट क्रिएटर्सची कमतरता नाही. माझे त्यांना आवाहन आहे की, त्यांनी विविध भारतीय भाषांमध्ये असे कंटेंट तयार करावेत, ज्यामुळे या अभियानाला आणि समाजाला मोठी मदत होईल.
आपण सर्वजण मिळून समाजमाध्यमांचा वापर करून ‘नशामुक्त भारत’ हा संकल्प जनसामान्यांपर्यंत पोहोचवूया आणि युवकांना व्यसनापासून परावृत्त करुया. आपल्या प्रयत्नांची माहिती #NASHAMUKTYUVA या हॅशटॅगसह शेअर करा.



























