• August 10, 2026
  • टीम मनोगत भाजपा
  • 0

 

 

मुंबई, दि. 10 : उत्तर प्रदेशमधील बाराबंकी येथील बाल वैज्ञानिक पूजा पाल हिने शेतीतील समस्येवर उपाय शोधत ‘धूररहित थ्रेशर’ (Dust-free Thresher) चे मॉडेल बनवले. राष्ट्रीय बाल पुरस्कार आणि जपानचा प्रवास गाजवलेल्या पूजाचा नुकताच क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते मुंबईत गौरव करण्यात आला.

शेतात थ्रेशर चालवताना उडणाऱ्या धुळीमुळे होणारा त्रास टाळण्यासाठी तिने चिनी माती व पंख्याच्या मदतीने धूलिरहित थ्रेशरचे मॉडेल तयार केले. तिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ मिळाला आणि ती भारत सरकारतर्फे बाल वैज्ञानिक म्हणून जपानलाही जाऊन आली. ऑगस्ट २०२६ मध्ये मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे बँक ऑफ बडोदाच्या ११९व्या स्थापना दिन सोहळ्यात सचिन तेंडुलकर यांच्या यांनी पूजा पाल हिच्या संघर्षाची कहाणी ऐकत तिचा विशेष सन्मान केला.

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा