• August 10, 2026
  • टीम मनोगत भाजपा
  • 0

 

मुंबई, दि. 10 : E20 पेट्रोल टाकले तर इन्शुरन्स क्लेम मिळणार नाही ही एक अफवा आहे. जसे सामान्य पेट्रोल तसेच E20 पेट्रोल. केवळ E20 पेट्रोल टाकले म्हणून कुणीही तुमचा इन्शुरन्स क्लेम नाकारू शकत नाही. जेव्हा कोणतेही मोठे बदल करावे लागतात तेंव्हा त्यावर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे. मात्र E20 इंधनाबद्दल पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवता स्वतः तथ्ये तपासून पहा. 

E20 इंधनाची व्यापक चाचणी (testing), पडताळणी (validation) आणि सुरक्षा मानकांचे काटेकोरपणे पालन केल्यानंतरच ते सामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यात आले आहे. त्यामुळे वाहनाच्या सुरक्षिततेबाबत पसरवल्या जाणाऱ्या संभ्रम आणि अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका. E20 पूर्णपणे सुरक्षित असून भारताला ऊर्जा क्षेत्रात स्वावलंबी बनवणे, प्रदूषण कमी करणे आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे या दिशेने टाकलेले हे एक मजबूत पाऊल आहे. E20 मुळे मायलेजमध्ये सरासरी केवळ 0.6 किमी/लिटर इतकाच किरकोळ फरक पडतो. टायरमधील हवेचा दाब, वाहतूक आणि वाहन चालवण्याच्या पद्धतीचा मायलेजवर यापेक्षा जास्त परिणाम होतो.

फायदा 

E20 इंधन म्हणजेच पेट्रोल मधील इथेनॉलच्या ब्लेंडिंगमुळे ऊस, मका आणि शेतीतील टाकाऊ उत्पादनांचा वापर होतो. यामुळे शेतकऱ्यांना देखील आर्थिक नफा मिळत आहे.

इथेनॉल मिश्रित E20 इंधनामुळे देश व जगासमोर असलेल्या इंधन संकटावर देखील मात करता येत आहे. आज भारत इतर देशांकडून इंधन आयात करतो, E20 मुळे देशाच्या ₹1 लाख कोटींहून अधिक किमतीच्या परकीय चलनाची बचत झाली आहे.

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा