नवी दिल्ली, दि. 31 : आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना ‘ओलिय दाराजाली दोस्तलिक’ या उझबेकिस्तानच्या सर्वोच्च पुरस्काराने गौरवण्यात आले. हा मोदीजींच्या शिरपेचातील ३६वा आंतरराष्ट्रीय पुरस्कार आहे.
भारत आणि उझबेकिस्तानमधील ऐतिहासिक मैत्री, विश्वास आणि व्यापक धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी मोदीजींच्या नेतृत्वातील नवा भारत विशेष योगदान देत आहे. या योगदानासाठी उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शावकत मिर्झियोयेव यांच्या हस्ते हा सन्मान मोदीजींना प्रदान करण्यात आला.
भारताची ‘विश्वबंधुत्वा’ची भूमिका तसेच जागतिक शांतता, सहकार्य आणि विकासासाठी भारताच्या योगदानाची जगभरातून होत असलेली प्रशंसा या सन्मानातून पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे मनःपूर्वक अभिनंदन! आम्हाला आपला अभिमान आहे.



























