• September 4, 2026
  • टीम मनोगत भाजपा
  • 0

भारताने अंतराळ क्षेत्रात गाठले नवे शिखर!

मुंबई, दि. 4 : इस्रोच्या GSLV-F17 या प्रक्षेपकाने देशाचा पहिला ‘इमेजिंग सॅटेलाइट’ असलेल्या EOS-05 चे यशस्वी प्रक्षेपण करत त्याला जिओसिंक्रोनस कक्षेत प्रस्थापित केले आहे. इस्रोची ही यशस्वी मोहीम भारतासाठी अभिमानास्पद बाब आहे.

या यशस्वी मोहिमेमुळे अत्याधुनिक इमेजिंग तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. ‘EOS-05’ उपग्रहाद्वारे पृथ्वीवरील विविध भौगोलिक, पर्यावरणीय आणि नैसर्गिक घडामोडींचे अचूक निरीक्षण करणं शक्य होणार आहे.

EOS-05 हा भारताचा Geostationary Orbit काम करणारा पहिला समर्पित भू-इमेजिंग (पृथ्वी निरीक्षण) उपग्रह जो ४० मीटरच्या रिझोल्यूशनसह भारतीय उपखंडावर लक्ष ठेवेल. पृथ्वीपासून सुमारे ३६,००० किमी उंचीवर असलेला हा उपग्रह शेती, हवामान निरीक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर महत्त्वपूर्ण कामांसाठी मोठी मदत करेल.

इस्रोने साकारलेल्या या यशस्वी प्रक्षेपणाने भारताच्या स्वदेशी अंतराळ तंत्रज्ञानाची क्षमता पुन्हा एकदा जगासमोर सिद्ध केली आहे.

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा