• October 14, 2026
  • टीम मनोगत भाजपा
  • 0

काँग्रेसने प्रत्येक निवडणुकीनंतर आत्मचिंतन केले पाहिजे

नवी दिल्ली, दि. 14 : मतदास्याद्यांच्या ‘एसआयआर’ प्रक्रियेवरून देशभरात विरोधकांकडून निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन सुरू असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. “एसआयआर’च्या आडून राहुल गांधी घुसखोरांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा आरोप शाह त्यांनी केला. “मात्र, २०२९च्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड पराभवाला सामोरे जाण्यासाठी त्यांनी तयार राहावे,” असा थेट इशारा शाहेनी यावेळी राहुल गांधी आणि ‘इंडी’ आघाडीला दिला.

पुढे ते म्हणाले, आज गुजरातमध्ये तीन नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या आहेत. दोन नगरपालिका आणि एक महानगरपालिका मिळून एकूण १०४ जागांपैकी ९० जागांवर भारतीय जनता पक्षाने प्रचंड विजय मिळवला आहे. गांधीनगर महानगरपालिका, जी माझ्या मतदारसंघामध्ये येते, तिथे भारतीय जनता पक्षाने ४४ पैकी ३८ जागांवर विजय मिळवला आहे, तर आम आदमी पक्षाने सर्व ३२ जागांवर निवडणूक लढवली आणि सर्व ३२ जागांवर त्यांची जमानत रक्कम जप्त झाली. गुजरातमध्ये भाजपचा हा प्रचंड विजय गुजरातच्या मतदारांच्या मूडचे प्रतीक आहे की, भारत आणि गुजरातचा मतदार आजसुद्धा मोदीजींच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.

मी ही गोष्ट स्पष्ट करू इच्छितो आणि विशेषतः राहुलजींना सांगू इच्छितो कि, ४१ वर्षांनंतरही आज काँग्रेस इथे एकही निवडणूक जिंकू शकलेली नाही. मी राहुलजींना हेही विचारू इच्छितो की, हा ‘SIR’ चा परिणाम आहे का? भारतीय जनता पक्षाची लोकप्रियता आणि मोदीजींची लोकप्रियता याला तुम्ही ‘SIR’ चा परिणाम म्हणून खोटे ठरवता? तुम्ही आत्मपरीक्षण केले पाहिजे. गुजरात, राजस्थान, त्रिपुरा आणि इतर राज्यांतील स्थानिक स्वराज्य संस्था आणि पोटनिवडणुकांमध्ये भाजप आणि एनडीएला मिळालेले यश जनतेचा पाठिंबा दर्शवते. नुकत्याच देशातील तीन राज्यांमध्ये पोटनिवडणुका झाल्या – पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी, जिथे काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही.

राहुल गांधीजींनी या निवडणूक निकालांतून धडा घेऊन आत्मचिंतन केले पाहिजे. प्रत्येक पराभवासाठी निवडणूक प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित करण्याऐवजी काँग्रेसने जनतेमधील आपल्या मान्यतेवर विचार केला पाहिजे. जनतेचा विश्वास केवळ आरोपांनी आणि प्रचाराने नाही, तर जनसंपर्क आणि जनसेवेने मिळतो. भाजप आणि एनडीएला मिळालेल्या समर्थनासाठी मी सर्व मतदारांचे मनापासून आभार मानतो.

मी राहुल गांधीजींना सांगू इच्छितो की, राहुल गांधीजी, ‘SIR’ च्या बहाण्याने घुसखोरांना वाचवण्याची तुमची जी कार्ययोजना आहे, ती देशातील जनता चांगल्या प्रकारे समजून चुकली आहे आणि आता भारतातील जनता तुमच्या जाळ्यात अडकणार नाही.
श्री राहुल गांधीजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मी हेही सांगू इच्छितो की, २०२९ च्या सार्वत्रिक निवडणुकीत एनडीए (NDA) प्रचंड बहुमताने जिंकून येईल आणि काँग्रेसचा सलग चौथ्यांदा पराभव होणार आहे. या देशाची जनता मोदीजींसोबत आहे, भाजपसोबत आहे, एनडीए सोबत आहे. मी भारतीय जनता पक्षाच्या वतीने सर्व मतदारांचे आणि कार्यकर्त्यांचे मनापासून धन्यवाद मानतो.

https://x.com/AmitShah/status/2110016129955692764?s=20

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा