• August 13, 2026
  • टीम मनोगत भाजपा
  • 0

 

मुंबई, दि. 13 : संपूर्ण देशात भारतीय स्वातंत्र्यदिनाची तयारी केली जात आहे. शासकीय पातळीवरही स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्यांनी ‘हर घर तिरंगा’ मोहिमेविषयी सांगितले आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात ‘हर घर तिरंगा’ अभियानाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक घरावर तिरंगा फडकवून स्वातंत्र्यदिनाचा उत्साह साजरा करावा, असे आवाहन मोदींनी केले. स्वातंत्र्यसैनिकांना आदरांजली वाहण्यासोबतच विकसित भारताच्या निर्मितीसाठी संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले आहे. ‘हर घर तिरंगा, हर मन में तिरंगा’ असा संदेश देत मोदी म्हणाले की, प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज फडकवून देशभक्तीची भावना अधिक मजबूत करूया, असेही मोदी या व्हिडीओमध्ये म्हणाले आहेत.

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा