फडणवीस सरकारच्या निर्णयाचे स्वागत

मुंबई, दि. 21 : महाराष्ट्रातील खुल्या प्रर्वगातील लिंगायत, वीरशैव लिंगायत आणि हिंदू लिंगायत या समाजातील विद्यार्थ्यांना राज्य सरकारच्या अमृत योजनेचा फायदा मिळणार आहे. याबाबतचा शासन आदेश नुकताच प्रसिध्द करण्यात आला आहे. खुल्या प्रवगातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी २०१९ मध्ये महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) करण्यात आली आहे. या प्रबोधिनी तर्फे उच्च शिशण, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि स्वयंरोजगारासाठी संधी उपलब्ध करुन दिल्या जातात. या योजनेचा फायदा हिंदू लिंगायत व वीरशैव लिंगायत समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास युवक, युवतींना देण्याची मागणी करण्यात येत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीचा विचार करत अमृत योजनेचा फायदा लिंगायत समाजातील विद्यार्थांना देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे लिंगायत समाजातील मान्यवरांनी स्वागत केले आहे.

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा