सोलापूर, दि. 1 : नवनिर्वाचित नगरसेवकांना महापालिकेच्या कामकाजाची माहिती आणि जबाबदाऱ्या समजून घेण्यासाठी नगरसेवकांचे ठाण्यात प्रशिक्षण शिबिर होणार आहे. अशी सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी स्पष्ट भूमिका मांडली. ठाण्यात ६- ७ सप्टेंबरला रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
पालिकेचे सर्व नगरसेवक ५ तारखेला प्रशिक्षण स्थळी दाखल होणार आहेत. ६ तारखेपासून सकाळी ९ वाजता प्रत्यक्ष वर्ग सुरू होतील. चार महापालिकांचे मिळून २०० नगरसेवक होणार सहभागी होणार आहेत. नगरसेवकांसाठी हे प्रशिक्षण अनिवार्य असून, गैरहजेरीला थारा दिला जाणार नाही, असे नरेंद्र काळे यांनी स्पष्ट केले.
प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार सर्व नगरसेवकांसाठी प्रशिक्षण शिबिर बंधनकारक आहे. महापालिकेचे कामकाज, सभागृहातील भूमिका, नियम आणि नगरसेवकांच्या जबाबदाऱ्या याबाबतचे प्रशिक्षण नगरसेवकांसाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.



































