नाशिक, दि. 7 : भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश गुरुपौर्णिमा समिती आयोजित विश्वगुरू भारत राज्यस्तरीय भव्य रांगोळी स्पर्धांचे पारितोषिक वितरण ठक्कर डोम नाशिक येथे उत्साहाने पार पडले. या स्पर्धांमध्ये शंभरहून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. या स्पर्धांमध्ये अनुक्रमे भारतीय गुरु शिष्य परंपरा, भारताची संरक्षण सिद्धता भारतीय अस्मितेचे मानबिंदू, आत्मनिर्भर भारतासाठी पंच परिवर्तन व भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा महामंत्र वंदे मातरम या विषयांवर रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते व सर्व विषयांवर कलाकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत रांगोळ्या रेखाटल्या. दिनांक 3 सप्टेंबर २०२६ रोजी रांगोळ्यांचे रेखाटन करण्यात आले तर दिनांक ४,५ व ६ सप्टेंबर २०२६ रोजी या रांगोळ्याची प्रदर्शनी भरवण्यात आली. प्रदर्शनी बघण्यासाठी नाशिक शहर व परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
बक्षीस वितरण समारंभात व्यासपीठावर विश्वगुरू भारत राज्यस्तरीय भव्य रांगोळी रांगोळी स्पर्धांचे प्रदेश संयोजक व प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पार्टी सुनील केदार, माजी महापौर सतीश नाना कुलकर्णी, भाजप प्रदेश चिटणीस रोहिणी नायडू, अध्यात्मिक आघाडीचे प्रदेश प्रभारी तुषार भोसले, भाजप पदाधिकारी महेश हिरे, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्चा श्रेष्ठ पदाधिकारी विक्रांत चांदवडकर, नाशिक महानगर सरचिटणीस रश्मी बेंडाळे , उत्तर महाराष्ट्र माध्यम विभाग प्रमुख गोविंद बोरसे, भाजप माजी सरचिटणीस पवन भगूरकर, नगरसेविका संध्या कुलकर्णी, डॉक्टर उमेश मराठे, विपुल मेहता, प्रसिद्ध रांगोळी कलाकार निलेश देशपांडे, डॉक्टर चंद्रशेखर नामपुरकर , भारती बागुल , प्रफुल्ल चव्हाण ,मयुरी शुक्ला, वैशाली विष्णू पिंगळे आदी उपस्थित होते, कार्यक्रम समारोपप्रसंगी नाशिक मधील नामवंत बांधकाम व्यवसायिक जितूभाई ठक्कर यांनीही प्रदर्शनी बघून समाधान व्यक्त केले व निलेश देशपांडे प्रसिद्ध रांगोळीकार हे नाशिकचे नामांकित कलाकार म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांनी या रांगोळी प्रदर्शनातून नाशिकचा गौरव वाढल्याचे उद्गार काढले, कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सुनील केदार यांनी सांगितले की रांगोळी स्पर्धांच्या माध्यमातून भारताचे प्राचीन परंपरा व विविध पौराणिक प्रसंगांवर प्रकाश टाकणारी ही स्पर्धा होती आणि स्पर्धकांनी आपल्या रांगोळीच्या माध्यमातून पौराणिक प्रसंगांना बोलके केल्याचे ते म्हणाले. विश्वगुरू रांगोळी स्पर्धांचे विषयी आपले मनोगत करताना सांगितले की कलाकारांनी रांगोळीच्या कलाकृतीतून विश्वगुरू भारताचा विविध प्रसंगांवर प्रकाश टाकणारा संदेश दूरवर पोहोचवण्याचे केलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगितले. यावेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पुढाकाराने राबवलेल्या विविध योजना व उपक्रमाचे फलक रांगोळी प्रदर्शनातील हॉलमध्ये लावण्यात आले होते. व हे फलक सुद्धा प्रेक्षकांचे आकर्षण ठरले यावेळी रांगोळी प्रदर्शनाचे कलाकार निलेश देशपांडे यांनीही थोडक्यात मनोगत व्यक्त केले. या रांगोळी स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून पहिला गट पाचवी ते दहावी प्रथम पारितोषिक मौर्य गायकवाड, द्वितीय क्रमांक मोक्षदा देशपांडे, तृतीय क्रमांक समृद्धी सोनार, उत्तेजनार्थ मुस्कान अन्सारी, लावण्या वाघ, मोठ्या गटात प्रथम पारितोषिक सुरेश पवार , द्वितीय पारितोषिक पूजा बेलोकर, तृतीय पारितोषिक शितल महाजन , उत्तेजनार्थ दिशा पाटील, स्वरा बोराडे यांना देण्यात आली आहेत. क्रमांकासाठी ११ हजार रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी ७ हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये, तर उत्तेजनार्थ २ हजार रुपये व सन्मानचिन्ह देण्यात आले खुल्या गटात बक्षिसांची रक्कम आणखी आकर्षक असून, प्रथम क्रमांकासाठी तब्बल २१ हजार रुपये व सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांकासाठी ११ हजार रुपये, तृतीय क्रमांकासाठी ७ हजार रुपये, तर उत्तेजनार्थ ३ हजार रुपये व सन्मानचिन्ह देण्यात आले आहेत.
या रांगोळी स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून प्राचार्य प्रफुल्ल चव्हाण, सौ. मानसी सागर यांनी काम पाहिले . या रांगोळी स्पर्धा यशस्वी होण्यासाठी नाशिकचे महाराष्ट्रातील प्रसिद्ध रांगोळीकार निलेश देशपांडे व त्यांचे सहकारी चंद्रकांत सासे, पूजा जोशी, शितल काकुळते, प्राजक्ता देशपांडे, श्रीकांत वाणी, स्वप्निल नेरे, स्वरा देशपांडे, मोक्षदा देशपांडे, निर्जला देशपांडे, सुजाता जोशी, आरती गरुड, व्यंकटेश मोरे विपुल मेहता यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी बापू शिंदे, हेमंत शुक्ला ,गणेश कांबळे , सातपूर मंडल अध्यक्ष गौरव बोडके, जुने नाशिक मंडळ अध्यक्ष पवन गुरव, कौशल वाखारकर ,रामहरी संभेराव आदींसह बहुसंख्य भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.








































