नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी आमदार प्रमोद जठार राहणार उपस्थित

मुंबई, दि. 20 : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांच्या प्रलंबित विकासकामे, विविध समस्या, शासकीय कामे आणि मूलभूत सुविधांबाबतची निवेदने स्वीकारण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने ‘सेवा अभियान’ आयोजित करण्यात आले आहे. काझी शहाबुद्दीन सभागृह, सावंतवाडी येथे सोमवार, २४ ऑगस्ट रोजी सकाळी १०.०० ते दुपारी २.०० या वेळेत हे अभियान पार पडणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या आवाहनानुसार अभियान राबविले जाणार आहे.

या महत्त्वाच्या जनसंवाद कार्यक्रमास आमदार प्रमोद जठार प्रमुख उपस्थित राहणार आहेत. तसेच भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्यासह जिल्ह्यातील सर्व मंडल अध्यक्ष, पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहून नागरिकांचे प्रश्न व निवेदने स्वीकारणार आहेत

ज्या नागरिकांची गावातील विकासकामे किंवा शासकीय कामे प्रलंबित आहेत, अशा सर्व नागरिकांनी आपल्या समस्या व निवेदनांसह या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप जिल्हा नेतृत्वातर्फे करण्यात आले आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रश्नांना योग्य न्याय मिळवून देऊन त्यांचा प्रभावीपणे पाठपुरावा केला जाणार आहे.

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा