मुंबई, दि. 25 : आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या २५ वर्षांच्या सार्वजनिक सेवापूर्तीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ दरम्यान ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे.
सेवा, समर्पण आणि राष्ट्रनिर्माणाचा विचार घेऊन आदरणीय मोदीजींनी २५ वर्षांच्या सार्वजनिक जीवनात केलेले कार्य समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवणे, जनसेवेचे उपक्रम व्यापक करणे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला या अभियानाशी जोडणे, हा या अभियानाचा संकल्प आहे.
या अभियानाच्या महाराष्ट्रातील प्रभावी अंमलबजावणीसाठी भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार मा. श्री. रविंद्र चव्हाणजी यांच्या प्रमुख उपस्थितीत दादर, मुंबई येथील वसंत स्मृती कार्यालयात ‘प्रदेश कार्यशाळा’ पार पडली.
यावेळी राष्ट्रीय सह संघटन मंत्री आदरणीय शिवप्रकाशजी, मंत्री तथा सेवा संकल्प अभियानाचे महाराष्ट्र प्रदेश संयोजक चंद्रकांतदादा पाटील, मंत्री तथा सेवा संकल्प अभियानाचे महाराष्ट्र व मुंबई प्रमुख आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा, भाजपा मुंबई अध्यक्ष आ. अमित साटम, प्रदेश सरचिटणीस आ. योगेश सागर, प्रदेश सरचिटणीस आ. माधवीताई नाईक, मा. प्रदेश सरचिटणीस सुनील राणे, मा.प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश मुख्यालय प्रभारी मा. रवि अनासपुरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.



































