मुंबई, दि. 29 : गेल्या काही दिवसांपासून नेपाळ आणि तिबेट सीमेवर आलेल्या भीषण पुरामुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. या संकटसमयी नेपाळमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजींनी तातडीने हालचाली सुरू केल्या.
याच प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातील एकूण १०६ भाविकांच्या सुरक्षित परतीचा प्रवास सुरू झाला आहे. नेपाळपासून पाटणापर्यंत त्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक समन्वय साधून त्यांना सर्वतोपरी मदत करण्यात आली आहे. तसेच पाटणाहून महाराष्ट्रात परतण्यासाठी त्यांच्या रेल्वे प्रवासाचीही व्यवस्था आदरणीय देवेंद्रजींच्या पुढाकाराने करण्यात आली.
आज सकाळी ७.३६ वाजता रेल्वे क्रमांक १७६०९ ने सर्व १०६ भाविक पाटणाहून नागपूरच्या दिशेने सुखरूप रवाना झाले आहेत. सर्व भाविक लवकरच महाराष्ट्रात आपल्या घरी सुखरूप पोहोचतील. यामुळे गेल्या काही दिवसांपासून काळजीत असलेल्या त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
संकट कितीही मोठं असो, आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांच्या मदतीसाठी तत्परतेने उभं राहणं, हीच आपल्या सरकारची ओळख आहे.













































































