मुंबई, दि. 26 : भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणीची बैठक प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मंगळवारी दि. २५ ऑगस्ट रोजी दादर मुंबई येथे संपन्न झाली.
समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी भाजपा परिवार सातत्याने कार्यरत आहे. ओबीसी समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सक्षमीकरणासाठी सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध योजना आणि उपक्रमांची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे. यासाठी समर्पित भावनेने कार्य करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पदाधिकाऱ्यांना केले.
या बैठकीला प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस आ. योगेश सागर, प्रदेश सरचिटणीस आ. माधवीताई नाईक, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष योगेश टिळेकर, आमदार गोपीचंद पडळकर, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे यांच्यासह ओबीसी मोर्चाचे पदाधिकारी उपस्थित होते.



































