प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिनी भाजप युवा नेते विशाल परब यांचा उपक्रम

सावंतवाडी, (सिंधुदुर्ग) दि. 21 : महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथीत जनसंपर्क कार्यातयात महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या पुढाकाराने तसेच सावंतवाडी विधानसभा भाजपा यांच्या वतीने अंध, अपंग व दिव्यांग बांधव-भगिनींना आधाराच्या काठ्या तसेच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी दिव्यांग बांधवांच्या चेहन्यावर उमटतेता आनंद आणि समाधान पाहून सामाजिक कार्यातून मिळणारे खरे समाधान अनुभवायता मिळाले. समाजातीत गरजू घटकांच्या पाठीशी उभे राहणे हीच खरी सामाजिक बांधितकी असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.

यावेळी बोलताना विशालजी परब म्हणाले, “दिव्यांग बांधवांसाठी हे जनसंपर्क कार्यालय कायम खुते राहीत. तुम्ही केव्हाही हाक द्या, तुमच्या अडचणीच्या काळात मी तुमच्यासाठी कायम उपलब्ध राहीन.” या शब्दांतून त्यांनी दिव्यांग बांधवांना आधाराची ग्वाही दिली. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसत्रा देसाई, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष अनित शिंगाडे, केतन आजगांवकर धिरेद्र म्हापसेकर सिद्धार्थ भांबूरे गोविंद साटेतकर बंटी जामदार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रसत्रा देसाई यांनी एक आठवण सांगताना नमूद केले की, विशाल परब यांच्या सुविद्य पत्नी यांनीदेखीत यावर्षी आपता वाढदिवस कुटुंबीयांसोबत साजरा न करता दिव्यांग बांधवांसोबत साजरा केला. यातून परब परिवाराचा दिव्यांग बांधवांप्रती असतेता जिव्हाळा, आपुलकी आणि सामाजिक बांधितकी स्पष्टपणे दिसून येते. या कार्यक्रमाता मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव उपस्थित होते. समाजातील गरजू घटकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचे कार्य असेच अविरत सुरू राहावे, हीच या उपक्रमामागची भावना आहे.

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा