सोलापूर, दि. 20 : – भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या अध्यक्षतेखाली सोलापूर येथे पश्चिम महाराष्ट्र विभागाची संघटनात्मक बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून बैठकीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. जयकुमार गोरे यांच्या हस्ते उपस्थित प्रमुख मान्यवरांचे अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांची मूर्ती देऊन स्वागत करण्यात आले.

बैठकीत पक्षाच्या संघटनात्मक कार्याचा सविस्तर आढावा घेत आगामी काळातील संघटनात्मक बांधणी, SIR पडताळणी तसेच पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील मतदार नोंदणी अभियान याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्रात भाजपा परिवाराची विचारधारा आणि जनसेवेचे कार्य तळागाळापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याने समर्पित भावनेने कार्य करावे, असे मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.

पक्षाचा तळागाळातील विस्तार अधिक मजबूत करण्यासाठी नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना मतदार नोंदणीची स्वतंत्र जबाबदारी देण्यावर विशेष भर देण्यात आला. आगामी राजकीय आव्हाने आणि बदलती राजकीय समीकरणे लक्षात घेता पक्षाची संघटनात्मक यंत्रणा अधिक सक्षम, सक्रिय आणि गतिमान करण्याच्या दृष्टीने बैठकीत महत्त्वपूर्ण रणनीती निश्चित करण्यात आली.

यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, SIR महाराष्ट्र प्रभारी भगवानदास सबनानी, SIR प्रदेश संयोजक डॉ. किरीट सोमय्या, आमदार सुरेश खाडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार महेश लांडगे, आमदार विजयमालक देशमुख, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार राजेंद्र राऊत, ज्येष्ठ नेते राजन मालक पाटील, आमदार देवेंद्र कोठे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार समाधान आवताडे, आमदार धैर्यशील कदम, दिलीपभाऊ माने, खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार मनोज घोरपडे, आमदार राहुल कुल, माजी आमदार संजयजी जगताप, आमदार सिद्धार्थ कांबळे, प्रदेश सचिव राम सातपुते, युवा मोर्चा भाजपा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, सोलापूर भाजपा अध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण, सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सौ. प्रियाताई महेश शिंदे, सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार-सावंत, युवानेते बाळराजे पाटील, सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल, सोलापूर शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकर, प्रणव परिचारक, सुशांत भैया क्षीरसागर, सुशील वाघमारे यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा