जालना, दि. 19 : विश्वप्रिय जननेते, यशस्वी प्रधानसेवक आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा संकल्प अभियानांतर्गत स्वच्छाग्रही श्री. सोमनाथ हिवाळे जी व त्यांच्या सहकाऱ्यांची निःशुल्क आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांच्या महत्त्वपूर्ण स्वच्छता सेवाकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांना “नमो देवा भाऊ प्रथमोपचार औषधी किट” प्रदान करून यथोचित सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमास डॉ स्वप्नील बी मंत्री मुख्य प्रदेश प्रवक्ते तथा मुख्य प्रदेश समन्वयक भाजपा चिकित्सा प्रकोष्ठ महाराष्ट्र प्रदेश श्री. रवी मूंदडा जी, श्री. रवी दायमा जी, डॉ. सुप्रिया मंत्री जी, श्री. तुकाराम पवार जी, रुग्णालयातील कर्मचारी तसेच नागरिकांची गरिमामयी उपस्थिती होती.

सेवा, सन्मान आणि आरोग्याच्या माध्यमातून समाजहिताचा संकल्प अधिक दृढ करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

ही पोस्ट शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

जास्तीत जास्त शेअर करा